सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

जे व्याधीने रंजले गांजले, निरामय परिवार मानी त्यास आपुले निरामय सेवा संस्थान मुंबई

माधुरी आफले | मुंबई | महाराष्ट्र

parivartan-img

जळगाव मध्ये  आरोग्य शिबिरात तपासणी करत असताना डॉक्टर

जीवघेण्या आजाराशी अविरत लढणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक, हे सगळे डॉक्टर, रुग्णालय, अनंत काळापर्यंत चालणाऱ्या तपासण्या, त्याच्यावरचे उपचार या सगळ्यासाठी मुंबईचा प्रवास. आजार वेगवेगळे पण सगळ्यांची  व्यथा एकच. या रुग्णांच्या नातेवाईकांकडे उपचार करण्यासाठी असलेला पैसा पण अपुरा पडतो I  कॅन्सर सारखा राजेशाही आजार पण  त्याच कॅन्सर पीडित रुग्णाला साधे  दोन वेळचे जेवण मिळण, हे पण का बर अवघड जातं, या प्रश्नाचे उत्तर खरंतर कोणाकडेच नाहीये I पण महाराष्ट्राची राजधानी असलेल्या   मुंबईत निरामय परिवार या सगळ्यांची राहायची सोय मुंबईतल्या सुखवस्तू वसाहतीत निशुल्क करतोच, शिवाय या रुग्णांना  जे अतिशय महाग उपचार असतात तेहि  सुलभ करून देण्यासाठी पुरेपूर मदत करतो I


धारावी मध्ये कोरोना काळात सर्व लोकांची तपासणी करत असताना निरामय चे कार्यकर्ते

बॉम्बे हॉस्पिटल पासून एक किलोमीटर अंतरावर धोबी तलाव येथील एक्मेपॅलेस अपार्टमेंट च्या पहिल्या मजल्यावर निरामय सेवा संस्थेचे ऑफिस आहे I जळगाव आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी ठिकाण तर मिळतेच, त्याशिवाय हा परिवार त्यांची काळजी पण घेतो I संस्थेचे कार्यवाह असलेले संघाचे चेतन जी सांगतात, "इथे येणाऱ्या रुग्णांना, कार्यकर्ता डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्यापासून, ते वेगवेगळ्या चाचण्या करणे, आणि पूर्ण इलाज होईपर्यंत प्रत्येक पावलो पावली मदत करतो, त्यांच्या पाठीमागे उभा असतो I रुग्ण आल्यानंतर तो पूर्ण बरा होईपर्यंत त्याची संपूर्ण काळजी एखाद्या कुटुंबाप्रमाणेच घेतली जाते.


निरामय परिसरात विश्राम करत असताना रुग्ण

 सुशील दगडू नावाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमातील पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याची ही एक कहाणी I याचे आयुष्य म्हणजे  निरामय ने दिलेली एक अमूल्य भेट आहे I महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील कनवट तालुक्यात मोलमजुरी करून आपल्या मुलाला शिकवणारा रामेश्वर दगडू, त्याला जेव्हा कळलं की अकरावीत शिकणाऱ्या आपल्या मुलाला ब्रेन ट्यूमर सारखा गंभीर आजार झाला आहे, तेव्हा तो बिचारा कोसळूनच गेला I ह्या आजाराचा उपचार खूप कठीण आणि  महाग पण आहे I ज्याची रोजची कमाईच जेमतेम दोनशे रुपये आहे तो हा एवढा लाखोंचा खर्च कसा करणार, परंतु त्याच्या सुदैवाने त्याला निरामय परिवार भेटला I सुमारे 22 लाख रूपए खर्च करून सुशिलची नऊ ऑपरेशन झाली, परंतु ही सगळी रक्कम संस्थेने उभी केली I इथे जे प्रेम आणि मदत सुशील ला मिळाली, ती सर्वांना मिळावी हेच त्याचे ध्येय आहे I

जळगाव येथील आणखीन एक घटना

75 वर्षाचे मधुकर दगडू यांना जेव्हा आज शहरातील रस्त्यांवर रिक्षा चालवताना बघतो, तेव्हा आपल्याला विश्वास बसणार नाही की दोन वर्षां पूर्वी यांना स्वादुपिंडाच्या कॅन्सरने ग्रासले होते I त्यांचं जगणच कठिन    होतं, पण त्यांचं  भाग्य असं, की त्यांची भेट निरामय चे पूर्णकालीन कार्यकर्ते सोमनाथ पाटील यांच्याशी झाली I जवळ जवळ दोन वर्ष त्यांच्यावर उपचार झाले I ते बरे होईपर्यंत निरामय कार्यकर्ते कुटुंबातील एखाद्या मोठ्या भावा प्रमाणे त्यांच्याबरोबर उभे होते I उपचारांसाठी लागणारा सर्व खर्च सरकारच्या माध्यमातून उभा केला गेला I


अशा अनेक घटना कित्येक वर्षापासून या परिसरात घडत आहेत I संस्था स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे रामेश्वरजी सांगतात, जळगाव आणि आजूबाजूच्या गावातून कॅन्सर सारख्या असाध्य रोगाशी झगडणाऱ्या गरीब लोकांना मुंबईमध्ये चांगले उपचार मिळावेत, या उद्देशाने निरामय सेवा संस्था 2014 मध्ये आस्तित्वात आले, त्यावेळेचे संघाचे क्षेत्र प्रचारक मुकुंदराव पणशीकर, यांच्या प्रेरणेतून आणि त्या वेळेचे आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून, स्थापन झालेली ही “निरामय सेवा संस्था” ही रुग्णांसाठी वरदान ठरलेली आहे I

 2014 पासून आत्तापर्यंत, मुंबईत हजारोंच्या संख्येने गरीब रुग्णांचा उपचार निरामयच्या माध्यमातून झाला आहे I इतकेच नाही तर जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातून वेळोवेळी आयोजित केलेल्या 140 होऊन अधिक वैद्यकीय शिबिरातून किमान दोन लाखाहून अधिक रुग्णांवर प्राथमिक उपचार झाला आहे I ज्या आजाराचं नाव ऐकूनही लोक घाबरतात, अशा रुग्णांना मुंबईत आणून टाटा मेमोरियल सारख्या हॉस्पिटलमध्ये दाखवणे, आणि सर्व चाचण्या करणे, हीच खूप मोठी कसोटी असते I  निरामयमध्ये आलेले बरेचसे लोक मोलमजुरी करणारे , अशिक्षित भूमीहीन शेतकरी असतात, त्यामुळे इथले कार्यकर्ते हेच त्यांचे सहकारी, मित्र आणि मार्गदर्शक होऊन त्यांना मदत करतात I रुग्णांना घेऊन नाव नोंदणी करण्या पासून, ते योग्य डॉक्टर शोधणे, त्यांच्या अपॉइंटमेंटस् घेणे, सगळ्या चाचण्या करून शेवटी उपचारांसाठी सरकारी मदतही उपलब्ध करण्यापर्यंत, सर्व ठिकाणी सहकारी  भूमिकेत राहतात I इतकेच नाही तर प्रसंगी गंभीर रुग्णांना गावी जाण्यासाठी रुग्णवाहिकेची पण सोय करतात I देवगिरी प्रांताचे सेवा प्रमुख राहिलेले, आणि या कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका निभावणारे निरामय चे एक विश्वस्त, योगेश्वर गर्गे म्हणतात, मागच्या एक वर्षातच 48 रुग्णांना 74 लाख 96 हजार 334 एवढी रक्कम मुख्यमंत्री निधीतून मिळाली, आणि निरामय ट्रस्टने बाकी रक्कम समाजाच्या मदतीने उपलब्ध उभी केली I त्यांनी पुढे असेही सांगितले, की कोरोना काळात बंद झालेली 1180 क्लिनिक संस्थेने सुरू केली, त्याच प्रमाणे 27 रुग्णालयात सेवा सुरु झाली I कोरोना काळात मास्क , सैनिटाइजर , औषध, ऑक्सीमीटर यांचे वाटप तर केलेच, पण धारावी वस्तीत सर्व लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यासाठी पण मदत केली I

संपर्क श्री चेतनजी

मो.नं.: – +91- 8805125418

433 Views
अगली कहानी