सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

सेवागंगोत्री-डॉक्टर माधवराव परळकर

महाराष्ट्र

parivartan-img

बेशुद्ध बालकाच्या शरीरावर जसजशी डॉक्टरांची बोटे फिरू लागली, तसतशी मुलाची होणारी हालचाल पाहून आईच्या डोळ्यांत चमक वाढू लागली होती. मुलाच्या उपचारासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करूनही नीट होण्याची कोणतीही अपेक्षा नसताना  हा चमत्कार घडत होता, आणि या साठी डॉ. परळकर यांनी तर एक रुपयासुद्धा घेतला नव्हता. हा चमत्कार परळकर यांच्या हाताच्या मसाजचा होता, का माधवरावांच्या नसानसात वाहणाऱ्या सेवाभावनेचा होता, कोणास ठाऊक! गंभीर पॅरालिसिसने ग्रस्त असलेला तो बालक 6 तासांमध्येच उठून बसला. आज तोच बालक मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित चार्टर्ड अकाऊंटंटपैकी एक आहे. सी.ए. कंचन नारंग यांच्यासारख्या किती तरी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी माधवरावजी हे ईश्वराचा अवतार होते. डॉ. परळकर संघाचे असे प्रचारक होते ज्यांचे जीवन सेवेची अविरत गंगोत्री आहे. तीतून किती तरी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे कष्ट दूर झाले. मुंबईत उपचार करून घेणाऱ्या गरीब रुग्णांसाठी नाना पालकर रूग्ण सेवासदन एक वरदान ठरलंय. त्याची स्थापना डॉ. परळकर यांनी केली होती.

बालपणापासूनच संघाचे स्वयंसेवक असलेले माधवराव परळकर मेधावी विद्यार्थी होते. सन 1947 मध्ये आयुर्वेदातील वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर काही दिवस क्लिनिक चालवल्यावर ते संघाचे प्रचारक बनले. त्या काळात ते वांद्र्याहून विरार आणि चेम्बूरपर्यंत सायकलने प्रवास करित  असत. आपले वाक्चातुर्य आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले परळकर हे तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. त्यांनी अनेक वर्षे विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय संघटन मंत्री म्हणून काम केले. मात्र त्यांच्या मनातील रुग्णांबद्दलची सेवाभावना पाहून  तत्कालीन सरसंघचालक परमपूज्य श्री गोळवळकर गुरुजी यांनी डॉ. परळकर यांना गरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या राहण्या-खाण्याच्या सोईसाठी एका सेवासदनाची स्थापना करण्याची जबाबदारी सोपवली.

कर्करोग आणि क्षयरोग यांसारख्या गंभीर आजारांचा उपचार महाग आणि दीर्घ असतो. रुग्णाला तर हॉ‍स्पीटलमध्येच जेवण मिळते, मात्र नातेवाईकांसाठी या महानगरात राहण्याचा व खाण्याचा खर्च सोसणे खूप अवघड असते. आज टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलपासून अर्धा किलोमीटर दूरवर असलेले दहा मजल्याचे  नाना पालकर स्मृती रूग्ण सेवासदनाची इमारत, रुग्णांसाठी घर आणि आप्तांची भूमिका पार पाडत आहे. दहा रुपयांत जेवण आणि एक महिन्यापर्यंत नि:शुल्क राहण्याची सोय या कुटुंबांसाठी खूप मोठा आधार आहे. आपल्या अखंड परिश्रम आणि निःस्वार्थ सेवाभावनेच्या जोरावर वीट-वीट जोडून परळकर यांनी हे सेवासदन उभे केले आहे.




परळकरांनी समाजातील प्रत्येक वर्गाचे सहकार्य घेतले. सामान्य  स्वयंसेवक कुटुंबांकडून वार्षिक 500 रुपये तर बिर्ला फाऊंडेशनचे मालक आदित्य बिर्ला यांच्याकडून 75 लाख रुपयांची लिथोट्रेस्पी मशीन दान म्हणून घेतली. तसेच डॉ. अजीत फडके यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये राहण्यास आणि गरीब रुग्णांवर लेसर ऑपरेशन मोफत करण्यासाठी सहमत करून घेतले. परळकर यांच्या अथक मेहनतीतून सुरू झालेले गोखले डायलिसिस सेंटर आज 14 यंत्रांनिशी अनेक शिफ्टमध्ये गरीब रुग्णांना निःशुल्क डायलिसिस सुविधा पुरवत आहे. सेवासदनचे ट्रस्टी आणि परळकर यांचे सहकारी राहिलेले विवेक छत्रे यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईच्या वैद्यकीय वर्तुळात परळकर हे सर्वात प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक होते. त्यांच्या या अप्रतिम सेवाभावनेमुळे बॉम्बे हॉस्पिटलचे डीन डॉ गोयल यांच्यासकट सगळे मोठे डॉक्टर धोतर-कुडता घातलेल्या या सामान्य दिसण्याऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरांना सर्व तऱ्हेने मदत करण्यास तयार असत. माधवरावांच्या अथक प्रयत्नांनी सुरू झालेल्या गोखले डायलिसिस सेंटरमध्ये माधवराव यांनी जीवनाच्या एक-एक क्षणाचा उपयोग समाजाच्या हितासाठी केला होता. आणीबाणीच्या काळात तुरुंगात असताना कैद्यांना योग शिकवला, तसेच मसाजच्या अद्भुत कलेद्वारे शेकडो रुग्णांना पैसे न घेता नीट केले. वयाच्या 81व्या वर्षी 22 फेब्रुवारी 2008 मध्ये शेवटचा श्वास घेण्यापूर्वी त्यांनी नाना पालकर स्मृती संस्था सात मजल्यांपर्यंत वाढवली होती.

1412 Views
अगली कहानी