नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
केरळ
६ मार्च रोजी केरळमध्ये अन्दोरकोणम नावाच्या एका छोट्याशा गांवी रंगराजन (नाव बदललेले आहे) नावाच्या एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू कोरोना मुळे झाला. खेदाची गोष्ट अशी कि या बिकट प्रसंगी त्याच्या कुटुंबियांना त्याच्या आजारापेक्षा जास्त संघर्ष त्याच्या अंत्य संस्कारासाठी करावा लागला. सर्व प्रयत्न करूनही त्यांना एकही स्मशानात अंत्य संस्कारासाठी जागा मिळाली नाही. शेवटी त्यांनी अखेरचा उपाय म्हणून केरळच्या सेवा भारती कडे धाव घेतली. काही वेळातच त्यांच्या घरासमोर अंत्यसंस्कार करणारी मोबाइल व्हॅन आली. सेवा भारतीच्या कार्यकर्त्यांच्या साहाय्याने केवळ दोन गॅस सिलिंडरचा वापर करून या व्हॅन द्वारा रंगराजन यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सेवा भारतीद्वारे चालवण्यात येणाऱ्या या चलत चिताग्नी प्रकल्पामुळे केरळ मधील १३ जिल्ह्यांमधील अनेक परिवारांना आपापल्या कुटुंबातील मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणे शक्य झाले. केरळ सेवा भारतीचे अध्यक्ष श्री किरणकुमार जी यांनी दिलेल्या माहितीनुसार चिताग्नी हा पर्यावरण स्नेही प्रकल्प असून त्यात अंत्य संस्कारासाठी लाकडाचा वापर करावा लागत नाही.
कुणाचाही मृत्यू हि त्या कुटुंबावर ओढवलेली घनघोर आपत्तीच असते, पण जेव्हां मृत व्यक्तीवर शास्त्रोक्त पद्धतीने अंत्य संस्कार करण्यासाठी एकही स्मशानात जागा मिळू शकत नाही, तेव्हां या दुर्देवी कुटुंबाला किती मानसिक यातना सहन कराव्या लागत असतील याची कल्पनाही करता येणार नाही. केरळ मध्ये छोट्या छोट्या वस्त्यांमधे राहणाऱ्या कित्येक कुटुंबाना वर्षानुवर्षे या संकटाला तोंड द्यावे लागत होते. अशा वेळी आपल्या घराच्या अंगणात, परसात असलेल्या मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करणे, केव्हां १०-१० किलोमीटर दूर जाऊन एखाद्या ओसाड भूमीत अंत्यसंस्कार करणे, एवढाच मार्ग त्यांच्या पुढे होता.
कोरोनाच्या काळात तर या संकटाने फारच आक्राळ विक्राळ स्वरूप धारण केले होते. संकट एवढे मोठे होते कि, कित्येक कुटुंबाना आपापल्या मृत प्रिय व्यक्तींचे प्रेत आपल्या घरात तीन तीन दिवस ठेवावे लागत होते. २०१९ च्या या कठिन काळात केरळच्या सेवा भारतीने चिताग्नि हा प्रकल्प सुरु केला . हा प्रकल्प स्टार्ट चेयर ह्या कंपनीने तयार केला. या अंत्यसंस्कार रचनेद्वारे आणि केरळ सेवा भारतीच्या सौजन्याने केरळमधील १३ जिल्ह्यातील गरजू परिवाराना अंत्यसंस्काराची सेवा जवळजवळ पूर्णपणे निशुल्क पुरवली जात आहे. केवळ याच सेवेसाठी एक स्वतंत्र हेल्पलाइन सुरु करण्यात आल्याची माहिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दक्षिण क्षेत्र सेवा प्रमुख श्री पदमकुमार यांनी दिली आहे. या हेल्पलाइनचा वापर करून रोज अनेक कुटुंब या सेवेचा लाभ घेत आहेत. केरळ मधे अगदी दुर्गम भागातही तातडीने ही सेवा मीळू शकते, असा अनुभव तेथील रहिवासी देत आहेत.
ही मोफत अंत्यसंस्कार सेवा सुरु करण्यासाठी राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाच्या कोट्टायम विभागाचे संघचालक डॉ पी चिंदम्बरनाथ हे कित्येक
वर्षापासून प्रयत्न करीत होते, परन्तु त्यानां यश लाभले नाही. त्यांच्या मृत्युनंतर मात्र केवळ एका वर्षातच ही सेवा सुरु
करण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
स्वयंसेवकांनी यश मीळवले. चिताग्नि हे विद्युत् दहिन्यान्चेच एक छोटे रूप आहे.
त्यात मृत देहावर दाहसंस्कार करण्यासाठी लाकड़ांचा वापर न करता केवळ एक केव्हां दिड
सिलिंडर गैस चा वापर करण्यात येतो, अणि त्यासाठी फ़क्त दोन ते अडीच हजार
रूपए एवढा कमी खर्च येतो. त्याबरोबरच लाकड़ांचा वापर न केल्यामुळे पर्यावरणाचेही
रक्षण होते. गोरगरीब कुटुंबासाठी ही सेवा
म्हणजे एक मोठे वरदानच आहे. लवकरच या सेवेचा विस्तार दक्षिण भारतातील १००
जिल्ह्यांमधे करण्याची योजना आहे.
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।