सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

विनाशाच्या धरणीवर सृजनतेचा अंकुर

गुजराथ

Play podcast
parivartan-img

पांघरायला आकाश आणि अंथरायला जमीन, अशी आमची अवस्था होती.  माहित नाही, परमेश्वराची काय ईच्छा होती, परंतु गेल्या 40 वर्षात अमाप कष्ट करून कपडा लत्ता घरदार जे सर्व काही आम्ही उभे केले होतं ते सगळं एका क्षणात माती मोल झाले.

गुजरात मधील कच्छ या गावात 22 वर्षांपूर्वी आलेल्या त्या भयंकर  भूकंपात  झालेल्या नुकसान हानीच्या कथा सांगताना चापरेडी गावचे सध्याचे सरपंच श्री दामजीभाई यांचे डोळे आजही भरून येतात, परंतु पुढच्याच क्षणी  अटल नगर मधील सध्याची  पक्की घरे , मोठे रस्ते , शाळेच्या भव्य इमारती , पंचायत भवन आणि गावाच्या मध्यभागी असलेलं देवीचं सुंदर मंदिर, हे सर्व निरखत ते चपरेडी गावाचा  अटल नगर  मध्ये  पुनः प्रस्थापित होण्यामागचा इतिहास गर्वाने सांगतात. या विध्वंसक भूकंपाने  उध्वस्त झालेल्या 14 गावांना, सेवा भारती गुजरातने सेवा  इंटरनॅशनल च्या मदतीने  परत वसवले. या गावांपैकिच एक चापरेडी गाव होते, जे आज पूर्ण सुख-सोयींनी युक्त असे अटल नगर बनलेले आहे.


26 जानेवारी 2001 ला संपूर्ण भारत जेव्हा 52 वा गणतंत्र दिवस साजरा करत होता, तेव्हा सकाळी आठ वाजून 46 मिनिटांनी गुजरात मधील कच्छ जिल्हा एका अतिशय विनाशकारी भूकंपा ला तोंड देत होता. रिक्टर स्केलवर 7.7 ही तीव्रता दाखवणाऱ्या, सतत दोन मिनिटं धडधडणाऱ्या ह्या भूकंपात 13 हजार 805 लोक मृत्यू मुखी पडले होते. गुजरात मधील शेकडो गाव या भूकंपाने नष्ट झालीत्यातीलच एक गाव चापरेडी. भूकंपाच्या नंतर गावात राहणाऱ्या 300 कुटुंबांची पूर्णपणे वाताहात झाली होती. दहा लोक मृत्यू पावले होते आणि संपूर्ण गाव म्हणजे जणू एक मातीचा ढिगारा च दिसत होता.

पण अशा राखेच्या ढिगार्‍यातूनच सृष्टीचा सृजनांकुर फुटत असतो. भूकंपाच्या धक्क्यामुळे ज्यांच्या घरातील व्यक्ती मृत्यू पावल्या होत्या त्यांच्या कुटुंबीयांची ही हानी कधीच भरून निघणे शक्य नव्हते, परंतु लोकांचे जे काही भौतिक नुकसान या भूकंपामुळे झाले होते, अशा सर्वांना या सेवा भारती कार्यकर्त्यांनी गेलेल्या सगळ्या वस्तू नव्याने मिळवून दिल्या. ज्या ठिकाणी जुने गाव होतं तिथेच थोड्या अंतरावर एका रिकाम्या जमिनीवर पूर्ण गाव परत बसवलं गेलं. 2001 मध्ये भूमिपूजन, आणि 2004 मध्ये लोकार्पण झालेल्या या गावाला नवीन नावही मिळाले, ते म्हणजे अटल नगर.


नवीन गाव निर्माण करण्याच्या या कार्यात महत्त्वाचि कामगिरी बजावणारे कच्छ जिल्ह्याचे त्यावेळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह श्री महेश भाई ओझा सांगतात, हे काम फारस सोपं नव्हतं. चापरेडी बरोबरच अनेक गांव ही गावं उरलीच नव्हती, तर तिथे नुसतेच मातीचे ढीग साचलेले होते. जे लोक ह्या भूकंपातुन  वाचले होते, त्यांच्या करता ही लढाई अतिशयच कठीण होती. मुख्यतः मुलांचे शिक्षण चालू राहण्यासाठी शाळेच्या इमारती लवकर नीट करणे अतिशय गरजेचे होते.  श्री महेश भाई सांगतात "कच्छ भागातील चौदा गावांच्या बरोबरच जामनगर, बनासकाठा, पाटण या गावात सुद्धा उद्ध्वस्त झालेल्या शाळांच्या ६२ इमारती समाजाच्या मदतीने आज उभ्या आहेत.


आपल्या सगळ्यांना माहीत आहे की एक गाव बसवण्यासाठी काही दिवस नाही तर बरीच वर्ष अणि काही  पिढ्या लागतात. गावाच्या पुनर्निर्माण काळातील दोन वर्षात जुन्याच ठिकाणी बांबू वर पत्रे टाकून अगदी कमीत कमी साधनांमध्ये मध्ये रहात दगडाच्या चुलीवर स्वयंपाक करून आपलं जीवन जगणाऱ्या या लोकांच्या बरोबर कठीण प्रसंगी संघाचे स्वयंसेवक उभे होते. प्रांत मंत्री श्री महेश भाई ओझा म्हणतात या लोकांना भांडीकुंडी अंथरूण, पांघरूण, अन्नधान्य हे तर पुरवलंच, परंतु त्याच बरोबर त्यांच्या खचलेल्या मनात आत्मसन्मान  जागृत केला. गाव बसवण्याच्या पूर्ण काळात काही तांत्रिक गोष्टींसाठी फक्त तज्ञ लोकांना बाहेरून बोलावण्यात आले, बाकी  कुठलीही मदत घेतली गेली नाही, गावकऱ्यानी स्वतः आपले गाव बसवले. गावा साठी मोलमजुरी करत असतानाच ज्याला जे काम येते ते त्याने पूर्ण इमानदारीने केले, यामुळे माझे घर मी स्वतःच्या हाताने बांधले हा  आनंद तर मिळालाच, परंतु सरकारी दराप्रमाणे मजुरी पण मिळाली. घराचे बांधकाम सुरू असताना घामाने भिजलेल्या मातीतून निघणारया वासाने त्यांचे दुःख नाहीसे होणे शक्य नव्हते, पण दुःखाची बोच मात्र नक्कीच कमी झाली.


चापरेडीचे  सरपंच दामजी  भाई यांच्या मनात सेवा भारती गुजरात बद्दल प्रचंड कृतज्ञता आहे, ते म्हणतात हे कार्यकर्ते आमच्या गावात देवाप्रमाणे आले, आणि आमच्या सुखदुःखात ते आमच्या पाठीशी नाही तर आमच्या बरोबरीने उभे राहिले अणि आमच्या कल्पनेपेक्षाही सुंदर गाव बसवून दिले. कदाचित ह्या सगळ्या घटने कडे बघून पटते की विनाशातूनच सुजनतेचा अंकुर फुटतो”.

संपर्क : नारणभाई वेलाणी

मो.नं.: – 9727732588, 9428294365

569 Views
अगली कहानी