सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

अबला नव्हे निर्भया

गुजराथ

parivartan-img

क्षणभंगुर अशा आयुष्याचे मृत्यू हेच एक चिरंतन सत्य आहे  ह्याची प्रचिती माणसाला सगळ्यात जास्ती स्मशानाभूमीत येते .एक व्यक्ती जी काही वेळापूर्वी आपल्याबरोबर होती त्या व्यक्तीला आता अग्नी च्या स्वाधीन करायचे ही गोष्टच खूप भयंकर आहे स्त्रियांचा हळुवार कोमल स्वभाव बघता  हे दुःख त्या सहन करू शकणार नाहीत म्हणून कदाचित हिंदू संस्कृतीत मुली स्मशानभूमीत जात नसाव्यात.परंतु यातही काही मुली अशा आहेत की ज्यांनी करोना काळात स्वतःहून पुढे येऊन मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्याची जबाबदारी सांभाळली. अशाच राष्ट्रसेविका समितीच्या काही  सेविकांचा आपण परिचय करून घेऊया.

2021 चा काळ ज्या वेळेला कोविडच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. संक्रमणाच्या भीतीने लोक आपापल्या घरात घाबरून बसली होती, बाहेरही पडत नव्हती. करोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचे स्वतःचे नातेवाईकही तयार नव्हते, अशा वेळेला गुजरात मधील कच्छ येथील सुखपर गावातील हिना वेलानी, रिंकू वेकरिया, सुमिता भूडिया, तुलसी बेलानी यांच्यासह राष्ट्रसेविका समितीच्या दहा सेविकांनी घरातून बाहेर पडून घाटाची स्वच्छता तर केलीच, पण वेळ प्रसंगी चिता रचण्यापासून अंत्यसंस्कार करण्यापर्यंतचे सर्व काम करीत आपल्यातील निर्भयतेचा परिचय दिला.


 15 एप्रिल 2021 च्या संध्याकाळी भुज तालुका विकास अधिकाऱ्यांचा फोन संघ स्वयंसेवक रामजी वेलानी यांना गेला. त्यांनी विचारणा केली की संघाच्या मदतीने भुज मधील सरकारी हॉस्पिटल मधील 80 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येतील का? या सगळ्यांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास असमर्थता दाखवली आहे, आणि पुरेसे सरकारी कर्मचारी उपलब्ध नाही आहेत.

एवढी  वाईट  अवस्था बघून संघ कार्यकर्त्यांनी या कामासाठी पुरुष स्वयंसेवकांची एक टोळी बनवली . त्याच वेळेला रामजी वेलानी यांची मुलगी  हिना, हिने या कामात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. रामजी भाईंच्या मनात इतके कठीण काम हिना करू शकेल का अशी शंका आली, परंतु ही त्यांची शंका चुकीची ठरली. हिनाच्या बरोबर राष्ट्रसेविका समितीच्या आणखीन नऊ सेविका या कामासाठी तयार झाल्या.

आपला अनुभव सांगताना सौराष्ट्र प्रांताची राष्ट्रसेविका समितीची प्रांत-प्रचार प्रमुख हिना ताई सांगते, आम्ही तीन तीनच्या टोळीत काम करत होतो. नियमितपणे जाऊन स्मशान घाटाची सफाई तर केलीच, पण कडक उन्हात पीपीइ किट घालून अंतिम संस्कार करताना आम्हाला मुळीच अवघड गेले नाही. गावातील लोकांनीही सहकार्य केले. लोकांनी घरातून लाकूडं, तूप, कापूर हे सर्व देऊन खूप मदत केली. लॉक डाऊन च्या काळात भुज हॉस्पिटल आणि आजूबाजूच्या गावातील सर्व मृतदेहांवर या स्मशान भूमीत अंत्य संस्कार करण्यात आले. जवळजवळ 45 हून जास्त दिवस चालणाऱ्या या मोहिमेत 450 हून जास्ती मृतदेहांवर योग्य पध्दतीने  अंत्यसंस्कार या समितीच्या भगिनींनी केले.


जसेजसे काम हळूहळू वाढू लागले तसेतसेच अनेक तरुण कार्यकर्ते या उपक्रमाला जोडले गेले, आणि अंत्यसंस्काराचे काम सांभाळू लागले. मग समितीच्या या भगिनींनी देवी अन्नपूर्णा बनून क्वारंनटाईन लोकांसाठी जेवण देण्याची जबाबदारी सांभाळली. लॉकडाऊनच्या काळात सॅनिटायझर वाटणे घरी  शिवलेले मास्क वाटणे, एकटे असणाऱ्या असहाय्य वृद्धांना घरी फळ आणि भाजीपाला पोहोचवणे, औषधे पोहोचवणे, तसेच पोलिसांना मदत करण्यापासून ते वेगवेगळ्या तांत्रिकी बाजू सांभाळणे, अशा अनेक गोष्टींमध्ये मदत करत कुठलेही क्षेत्र सेविकांनी वगळले नाही.

एवढ्या सगळ्या गोष्टी या भगिनी एकाच वेळी कशा काय करू शकतात असे विचारल्यावर सर्वांचे एकच उत्तर समोर आले

संघाच्या कुटुंबातील संस्कार आणि समितीचे प्रशिक्षण वर्ग यामुळे सर्व शक्य होते.

म्हणूनच म्हणतात संघ शक्ती युगे युगे

521 Views
अगली कहानी