सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

तलासरीचा तपस्वी - माधवराव काणे

महाराष्ट्र | महाराष्ट्र

parivartan-img

उन्हाळा असो वा हिव्हाळा अथवा पावसाळा प्रत्येक ऋतूत पायात तीच एक साधी चप्पल, आणि अंगावर खूपच साधे धोतर-सदरा घालून, तलासरीच्या गावा - खेड्यात मैलोगणती दूर पायी चालत जाऊन, तेथील वनवासी मुलांच्या आयुष्यातील ज्ञानाचे दार उघडणारे माधवराव काणे! यांच्या पन्नास वर्षाच्या आयुष्यांच्या समर्पणाची कहाणी आम्हास जे सांगत असते, ती आम्हा सर्वांना व पुढच्या पिढीला ला शिकायची व शिकवायची गरज आहे।




१५ डिसेंबर १९२७ रोजी कल्याणच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले माधवराव काणे, राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे असे प्रचारक होते ज्यांच्या आयुष्याच्या  अभ्यासाने संघ म्हणजे काय हे नक्की समजू शकते। माधवराव काणे यानीं महाराष्ट्रातील ठाणे जिल्याच्या तलासरी क्षेत्रातील वनवासी मुलांच्या प्रगति साठी आयुष्याचे २८ वर्ष वेचले. तसे त्यांचे संपूर्ण आयुष्यच त्यानी समाज कल्याणासाठीच वापरले । तरुणपणी गोआ मुक्ती च्या चळवळीत सत्याग्रही म्हणून भाग घेतला व पुढे माधवराव कल्याण नगर पालिकेचे त्या वेळेचे देशातील सर्वात तरुण वयाचे अध्यक्ष झाले, व त्यांनी हा कार्यकाळ यशस्वी पणे पार पाडला।




पण ह्या तपस्वी माणसाने कल्याण विभागाचे प्रचारक दामू अण्णा टोकेकर ह्याच्या आव्हाना वर आपल्या स्वर्णिम राजनैतिक भवितव्याची आहुती दिली, व वनवासी सेवा कल्याणासाठी अग्रसर होऊन तलासरीच्या गांव खेड्या कडे पाऊल टाकले। माधवरावांच्या प्रयत्नाने १९६७ मध्ये हिंदू सेवा संघाच्या मदतीने फक्त पांच मुलांसोबत, एका झोपडीत वनवासी वसती गृहाची सुरुवात झाली, नंतर काणेजीं च्या प्रयत्नाने पावणे दहा ऐकड जागा देणगी म्हणून वनवासी कल्याण आश्रमाला मिळाली । ह्या वसती गृहात राहून मागील पंचावन्न वर्षात दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनिअर वगैरे बनून वेग वेगळ्या क्षेत्रात यश मिळवले, व व मोठं-मोठ्या पदांवर पोहचले। माधवराव २८ वर्षे ह्या मुलांना माणुसकी शिकवण्यासाठी व संस्कारित करण्यासाठी येथे राहिले. मुलांच्या कुटुंबांना भेटण्यासाठी माधवराव मैलोगणती दूर पायी चालत जायचे।




माधवरावांची सावली प्रमाणे सोबत करणारे संघाचे तृतीय वर्ष शिक्षित स्वयं सेवक, अप्पाजी जोशी सांगतात कि माधवराव आधुनिक काळाचे संत होते, ते सांगतात कि माधवराव नेहमी जमिनी वर झोपायचे, झोपडीत राहायचे, अणि प्रवास ही पायी चालून करायचे। माधवरावांच्या कठोर प्रयत्नांनी तलासरी,दहाणु, आणि पालघर मधील नक्सली दहशदवाद नाहीसा झाला। 




वयाच्या सतराव्या वर्षी माधवराव आई वडिलांच्या प्रेमाला मुकले पण वनवासी मुलांवर त्यांनी इतके प्रेम केलं कि १७ वर्षे आपली कल्याण ची खोली ह्या मुलांना घर म्हणून वापरू दिली। इतकेच नव्हे तर जेव्हा माधवरावांना कर्क रोगाने झपाटले, त्या वेळी त्यांनी डॉक्टरांना आग्रह केला कि माझ्या उपचारांवर खर्च होणारा पैसा ह्या वनवासी मुलांवर आणि वसतीगृहा साठी वापरा कारण माझी यात्रा इतकीच लिहिली आहे विधात्यानं।




" प्रसिद्धी च्या चकाकी पासून लांब राहून अणि गावा खेड्यातील अंधाराला सामोरे जाऊन वनवासी मुलांच्या आयुष्यात विकासाचा उजेड आणण्यास माधवरावांनी स्वतः ला समर्पित केले " दत्तोपंत ठेंगडीजी ह्यांचे हे सटीक वक्तव्य माधवरावांच्या संपूर्ण आयुष्याला पूर्णपणे परिभाषित करणारे आहे।

1312 Views
अगली कहानी