नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
देवीदास देशमुख | महाराष्ट्र
रामवतीच्या डोळ्यांतून अश्रू कृतज्ञता बनून वाहत होते. गेल्या 3 दिवसांपासून फक्त तांदूळ उकडून मुलं व नवऱ्याला खाऊ घातल्यानंतर बहुतेक ती उपाशीच झोपी जात होती. नाईलाजाने जवळच्या शेवग्याच्या झाडाच्या शेंगा तोडून विकण्याने होणाऱ्या कमाईने तीन मुले व सासू-सासऱ्यांचे पोट कसे भरणार? लॉकडाऊनमुळे नवऱ्याच्या रोजगारासोबतच घरातील अन्न-पाणीही हिरावले गेले होते. भोपाळच्या गोविंदपुरा सेक्टर-सी जवळ एका कच्च्या घरात राहणाऱ्या या कुटुंबाकडे जेव्हा सेवाभारतीचे कार्यकर्ते देवदूतासारखे रेशन साहित्य घेऊन पोहोचले तेव्हा रामवती आनंदाने रडली. लॉकडाऊनचे अडीच महिने या कुटुंबाला अन्नाचा तुटवडा पडू नये, हे निश्चित केले संघटनेचे पूर्णकाळ कार्यकर्ते करणसिंह यांनी.
तिकडे कोलकात्यातील बाग बझारच्या एका बहुमजली इमारतीच्या खाली एका फाटक्या गोधडीवर काही भांडी ठेवून शिळं-पाकं खाऊन गुजराण करणाऱ्या एका म्हाताऱ्या माऊलीसाठी लॉकडाऊन अनेक वर्षांनंतर घरचे गरम जेवण घेऊन आला. कढी-भाताचे वाटप करणारी टोळी वस्त्या-वस्त्यांमध्ये जेवणाचे वितरण केल्यानंतर फुटपाथ व रेल्वेच्या रुळांजवळ भिक मागून जगणाऱ्या लोकांना शोधायला निघाली, तेव्हा एका कोपऱ्यात ही माऊली त्यांना दिसली. काही दिवस संध्याकाळी कढी-भात खाल्ल्यानंतर मनोरमा अम्मांनी दिवसा जेवण देण्याची मागणी केली. तेव्हा जवळच राहणारे स्वयंसेवक सुमित साहू आपल्या घरून त्यांना नियमित गरमागरम जेवण पोहोचवू लागले. एके दिवशी स्वयंसेवकांवर आशीर्वादाचा वर्षाव करत या ज्येष्ठ महिलेने आपल्या दु:खी जीवनाची कथा ऐकवली, की कसं 10 वर्षांत पहिल्यांदा तिला व्यवस्थित जेवण मिळालं. आजपर्यंत ती मुरमुरे किंवा पोह्य़ांमध्ये पाणी मिसळून खाऊन गुजराण करत होती.
आता वळूया कोरोना विषाणूचा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट बनलेल्या इंदूरची, इथे रेल्वे स्थानकाजवळ एलाईट टॉवरमध्ये राहणाऱ्या मंजू अग्रवाल यांच्या आईचा अकस्मात मृत्यू झाला. तेव्हा न कोणी नातेवाईक आला ना शेजारी मदतीला आले. संघाच्या स्वयंसेवकांनीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. कोरोनाच्या काळात विश्वात तरंगणाऱ्या या सेवा कथांचे सूत्रधार ठरले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. त्यांनी या जागतिक महामारीला सेवेची संधी मानलं, आणि केशरी बाणा वागवत मनात राष्ट्रभाव घेऊन मुंबई, दिल्ली व इंदूरच्या हॉटस्पॉट भागांसह देशभरात अखंड सेवा करत राहिले. बाराबंकीचे जिल्हा कार्यवाह अजयकुमार यांचे बलिदान आपला देश, कधीच विसरू शकणार नाही. शुक्रवार ता. 22 मे रोजी लखनऊ-अयोध्या हायवेवर रेशनचे वाटप करताना ते एका ट्रक अपघाताचे बळी ठरले. व्यवसायाने प्राथमिक शिक्षक असलेले अजयजी गेल्या 55 दिवसांपासून सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत गरजू लोकांना तयार जेवणाची पाकिटे व कोरड्या शिध्याची पाकिटे वाटत होते. एका गरजूसाठी कारच्या डिक्कीतून रेशनचे पाकिट काढताना ते या अपघाताला बळी पडले.
आकडेवारीत बोलायचे तर संघाचे अखिल भारतीय सेवाप्रमुख परागजी अभ्यकंर सांगतात, की 5 जून 2020 पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सेवाभारतीच्या माध्यमातून 92,656 ठिकाणी 7,38,1802 म्हणजे 73 लखांपेक्षा अधिक रेशन पाकिटे व 4 कोटीपेक्षा अधिक तयार जेवणाची पाकिटे वाटण्यात आली. ते म्हणतात, की स्वयंसेवकांनी सेवा हे आपले सौभाग्य मानले आणि अखंड सेवाकार्यात स्वत: ला जुंपले.
जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनेने जगातील सर्वात मोठ्या महामारीशी लढण्यासाठी सरकारच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम केले. जे लोक कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क विकत घेऊ शकत नव्हते, अशा 90,02,313 जणांना मास्कचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या 1 लाख 90 हजार लोकांना राहण्याची जागा देण्यात आली. असा एकही आयाम नव्हता जिथे संघाचे स्वयंसेवक सेवेसाठी तत्पर नव्हते. डॉक्टरांसोबत पीपीई किट घालून स्क्रिनिंगसाठी निघालेले युवा स्वयंसेवक असो, किंवा गर्भवती भगिनींच्या पोषणाची चिंता करणाऱ्या राष्ट्र सेविका समितीच्या भगिनी असो, ही एक अनंत यात्रा होती.
राष्ट्रीय सेवाभारतीच्या 24 तास चालणाऱ्या हेल्पलाईनवर मदत मागणाऱ्या गरजू कुटुंबांची व्यवस्था पाहणाऱ्या राष्ट्रीय सेवाभारतीचे महामंत्री श्रवणकुमार म्हणतात, की आम्ही त्यांचीही व्यथा ऐकून घेतली जे सांगू शकले नाहीत. दिल्लीतील यमुना पार्क, पुण्यातील रेडलाईट भागांमध्येसुद्धा आमची टीम सतत रेशन पोचवत होती. इंदूरमध्ये भयानक होणाऱ्या कोरोना संकटाच्या काळात अखंड ड्यूटी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना जेव्हा विश्रांती द्यायची वेळ आली तेव्हा बॅरिकेड्सची जबाबदारी स्वयंसेवकांनी सांभाळली.
"हरि अनंत हरि कथा अनंत" च्या धर्तीवर संघाची ही सेवायात्रा चालू राहील. पुढची कहाणी सेवागाथाच्या पुढच्या अंकात...........
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।