सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय!

अभिजीत खेडकर | गुजराथ

parivartan-img

देशाच्या इंटरनेशनल ज्युनिअर फुटबाल टीम ला गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने चार प्रतिभाशाली खेळाडू अहमदाबादच्या एका सरकारी शाळेने दिले आहेत ही खरोखरच एक अविश्वसनीय गोष्ट आहे. एवढच नाही तर यातील अरुणा चौहान हिला २०१९ साली सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून देखील घोषित करण्यात आलं होतं. गुजराथ सरकार च्या माध्यमातून २०१२, २०१६ आणि २०१९ साली आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय गणित आणि विज्ञान प्रदर्शनात याच विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अद्वितीय यश मिळवून दाखवलं होतं. अहमदाबाद शहरातील साऱ्या नामांकित खाजगी शाळांना मागे टाकत खेळापासून ते विज्ञानापर्यंत सगळ्या विषयात आपली यशस्वी घौडदौड अखंडपणे सुरु ठेवणारी हि सरकारी शाळा आहे, “थलतेज विद्यालय.” या विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये हा दुर्दम्य आत्मविश्वास जागवणारे शिक्षक आहे, संघ स्वयंसेवक श्री महेशभाई ठक्कर. महेशभाई २००६ पासून या विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राज्य सरकार चा आदर्श शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. 

विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासूनच शिक्षण, संस्कार आणि राष्ट्रवादाचे विचार रुजविणाऱ्या महेशभाईंचा “उर्जा उत्सव २००३” मध्ये मातीच्या फ्रीज चे मॉडेल बनवून दाखविल्यामुळे, तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला होता. महेशभाईंनी सहा ते चौदा वयोगटातील झोपडपट्टीत राहणाऱ्या अनेक शाळाबाह्य मुलांना शाळेत यायची गोडी लावली, एव्हढच नाही तर त्यांच्या पालकांना व्यसनमुक्त करण्यासाठी देखील चांगले समुपदेशन हि केले. सन २००० मध्ये गुजराथ च्या पाटण जिल्ह्यातील दातरवाडा गावी शिक्षक म्हणून कार्यरत असतांना “व्यसनमुक्त दातरवाडा” अभियानात त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती. प्रत्येक विद्यार्थ्यात असलेली प्रतिभा ओळखून त्याला त्या विषयात प्रेरित करणे हेच एका आदर्श शिक्षकाचे कर्तव्य असते. सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या संगीता प्रजापती ला तिच्या मानसिक विकलान्गतेमुळे कोणतीही शाळा प्रवेश देत नव्हती. महेशभाईंनी सरकारी नियमानुसार तिला खास आपल्या देखरेखीखाली तिच्या आवडीच्या चित्रकला विषयात प्रोस्ताहित केलं. आठव्या इयत्तेपर्यंत येईपर्यंत संगीता संपूर्णपणे सामान्य विद्यार्थिनी झाली होती. तिची हि यशोगाथा आय.आय. एम. च्या संकेतस्थळावर प्रदर्शित केली गेली आहे. दहावी उत्तीर्ण झालेली संगीता आता कला शिक्षक बनण्याचे स्वप्न बघते आहे. 


महेशभाईंचा शिष्य असलेला अणि याच सरकारी विद्यालयात शिकून वैज्ञानिक बनलेल्या कानकभाई पटेल, याच्या सहयोगाने गावात आता “कमला बा नि:शुल्क पाठशालेचा” श्रीगणेश केला. इथल्या सेवावस्तीमध्ये धान्य वाटपासाठी आलेल्या “प्रयास क्लब” च्या चार महिलांनी महेशभाईंच्या कार्यांमुळे प्रभावित होऊन, या केंद्रासाठी कुठलेही मानधन न घेता वेळ देण्याचा संकल्प केला. या केंद्रात आता विज्ञान, गणित, हिंदी, इंग्लिश, कॉम्पुटर आणि चित्रकला हे विषय प्रयास क्लब च्या ४३ महिला फक्त नि:शुक्ल शिकवतच नाही तर, आपल्या स्वतःच्या मुलांसारखी या सगळ्या मुलांची काळजीहि घेतात. एकही दिवस सुटी न घेता संपूर्ण वर्षभर सुरु असणारा हा विशेष प्रशिक्षण वर्ग मुलांच्या विकासासाठी समर्पित आहे. या वर्गातील मुलांना सुंदरवन, इस्रो, सायन्स सिटी, सेरीनिटी बॉटनिकल गार्डन अश्या वेगवेगळ्या ज्ञानवर्धक जागी सहलीसाठी नेले जाते. 

महेशभाई म्हणतात, “ जशी एखाद्या चांभाराची दृष्टी सदैव चपलांवर असते, तशी शिक्षकाची नजर नेहमी आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रतीभेकडे असली पाहिजे.” सन २०११ पासून या प्रकल्पातील १५-१६ विद्यार्थी सायन्स प्रोजेक्टसाठी निवडले जातात. आठवड्यातील एक दिवस या मुलांना प्रख्यात विक्रम साराभाई सायन्स सेंटर च्या अत्याधुनिक प्रयोगशाळेत, शहरातील सधन घरातील हुशार विद्यार्थ्यानसोबत, प्रयोग करण्याची संधी मिळते. यातील प्रत्येक विद्यार्थी आपल्या वर्गातील सुमारे ४० विद्यार्थ्यासोबत आपला अनुभव आणि ज्ञानाचे आदानप्रदान करतो. सायन्स सेंटर ला जाणाऱ्या या सर्व मुलांचा खर्च वैज्ञानिक आणि शहरातील २७ समाजसेवी संस्था करीत असतात.  

स्वीडन ची एक SFK नावाची कंपनी या थलतेज विद्यालयाला अमूल्य आर्थिक सहयोग करीत आहे. मेधावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाआड त्यांची निर्धनता येऊ नये, या साठी आठवी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतंत्र काळजी घेऊन “शून्य विद्यार्थी गळती” चा संकल्प पूर्ण केला जातो. यासाठी महेशभाई स्वतः विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सतत संपर्कात असतात. गेल्या वर्षी आणि या वर्षी कोविड च्या संकटामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा दिलेल्या मुलांसमोर “आता पुढे काय?” हा मोठा यक्षप्रश्न होता. शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, अभियंता बनण्याच्या त्यांच्या स्वप्नाच काय होणार, हि चिंता त्यांना पैशाच्या अभावी सतावत होती. त्यासाठी मागच्या जून महिन्यात या मुलांना एकत्र करून त्यांच्यासाठी खास मनोवैज्ञानिक समुपदेशन, आय.क्यू टेस्ट आणि करियर गायडेंस ची व्यवस्था करण्यात आली. अनेक पातळींवर विविध बैठका आणि समुपदेशन एवढेच नाही तर स्पर्धा परीक्षांसाठी त्यांची तयारी आणि शुल्काची देखील व्यवस्था करण्यात आली. 

“एका शिक्षकाचा तुटपुंजा पगार त्याला किती प्रेरणा देऊ शकेल, परंतू त्याची श्रमनिष्ठा आणि समाजाबद्दलचा दृष्टीकोन जर विद्यार्थ्यांसोबत जोडला गेला, तर संपूर्ण समाजच नाही, तर देशाचे चित्र बदलू शकते...आणि हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेल्या महेशभाईंनी सिध्द करून दाखवले आहे.

935 Views
अगली कहानी