सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

शिवे गावातील उत्कर्षाचे उत्प्रेरक-वीर सावरकर मंडळ

भालचंद्र जोशी | महाराष्ट्र

parivartan-img

बबन दगडू यांच्यावर आज जणू संकटांचा पहाड कोसळला होता. बबन दगडू हा एक गरीब कुंभार. शहरात मडकी विकून पोट भरेना, तेंव्हा तो आपल्या गावी परत येऊन शेती करू लागला. परंतु, दुर्दैव असे की पाच महिने दिवस-रात्र खपून शेतात जे 40 क्विंटल पीक आले ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या संकटाच्या वेळी त्याच्या मदतीला वीर सावरकर मंडळाचे तरुण कार्यकर्ते धावून आले. त्यांनी बबन दगडूला गावातूनच 25 क्विंटल धान्य आणि वीस हजार रुपये रोख रक्कम गोळा करून दिली. पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात शिवे या गावातील ही कहाणी.




संघ स्वयंसेवकांनी तेथे वीर सावरकर मंडळ स्थापन केले. आज या मंडळातर्फे गावातील लहान शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत केली जाते. सातपुते यांच्या घराला आग लागून नष्ट झाले, तेंव्हा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी एक लाख 75 हजार रुपये जमवले आणि त्यांचे घर पुन्हा उभे राहिले. मंडळातर्फे गावात रामचंद्र गडदे स्मृती वाचनालय, संगणकाचे नि:शुल्क प्रशिक्षण वर्ग, असे उपक्रमही राबवण्यात येतात. ग्रामविकास समिती आणि सावरकर मंडळाच्या माध्यमातून गावात शिक्षा, आरोग्य व अन्य क्षेत्रांत विधायक कार्य करण्यात येते.




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्र जागरण अभियानात सन 2000 साली गावात संघाचे स्वयंसेवक प्रथम गेले. प्रांत सह ग्रामविकास प्रमुख श्री. रमेश कुमार कोबळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे साप्ताहिक शाखा सुरू केली. या शाखेतून जडणघडण झालेल्या स्वयंसेवकांनी गावात विविध कामे हाती घेतली, असे सावरकर मंडळाचे संस्थापक श्री. रोहिदास गडदे सांगतात.

गेली अठरा वर्षे येथे पाच दिवसांची वार्षिक व्याख्यानमाला नियमाने होत असून त्याद्वारे राष्ट्रभक्तीच्या भावना जागृत केल्या जात आहे. मंडळातर्फे दर वर्षी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो, त्यामुळे अनेक गरीब कुटुंबातल्या भगिनींची लग्न एक पैसा खर्च न होता होताहेत. आतापर्यंत चारशेहून अधिक गरीब कुटुंबातल्या मुलींची लग्न झाली आहेत. गावात महिला आणि पुरुषांचे वेगवेगळे स्वयं सहायता गट स्थापन करण्यात आले आहेत.




त्यामुळे छोट्या मोठ्या अडचणीत कर्ज मिळू लागले असून सावकाराच्या दारी जाण्याची गरज उरलेली नाही. स्वमदत मंडळामार्फत केवळ एक टक्का व्याजाने कर्ज देण्यात येते. श्री रामगीर बाबा शिक्षण संस्थेद्वारा गावात ज्ञानदीप विद्यालय चालवण्यात येते. यामागेही सावरकर मंडळाची मुख्य भूमिका आहे. रामचंद्र गडदे स्मृती वाचनालयातर्फे सरकारी पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण वर्ग चालवण्यात येत आहेत. तेथे चालवण्यात येणाऱ्या संगणक प्रशिक्षण केंद्रात सरकारी विद्यालयातील विद्यार्थीही संगणकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. वाचनालयात 15 हजारांहून अधिक पुस्तके आहेत, हे ज्ञानाचे भांडार कधीच रिकामे होणार नाही.


संपर्क : रोहिदास गडदे

+919850667265

1009 Views
अगली कहानी