नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
महाराष्ट्र
आज डोंगरीपाड्यातील सात दशकांची प्रतीक्षा संपुष्टात आली होती . गावातील लोक आनंदाने नाचत होते. 73 वर्षांच्या शांताबाई खानजोडे यांना, घरोघरी पाणी पोहोचवणाऱ्या सौरपंपाकडे पाहताना डोळ्यातील अश्रू आवरता येत नव्हते. मुंबईपासून फक्त 80 किमी अंतरावर, पालघर जिल्ह्यातील, डोंगरीपाडा या गावातील लोक 72 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची वाट पाहत होते. गरोदर बायका असोत वा 10- 12 वर्षाची लहान मुले असोत, डोंगरीपाडाच्या डोंगराळ भागातील खडबडीत रस्त्यांने दीड किलोमीटर लांब जावून खाली विहिरीतून पाणी आणणे ह्या गोष्टीला दूसरा कुठलाच पर्याय नव्हता. यावर कळस म्हणजे पावसाळ्यात तो रस्ता ही बंद व्हायचा. पाणी नाही, वीज नाही, सरकारी शाळा नाही, पाण्याच्या अभावी एकंदरीत 33 कुटुंबांच्या गावात फक्त 7 शेतकरी शेतात नांगरणी करू शकत होते .
या कथेच्या वाचकांचा विश्वास बसणार नाही पण आज या गावात अॅस्ट्रोटर्फ असलेले क्रीडांगण आहे, महिलांना शिवणकाम शिकवण्याचे प्रशिक्षण केंद्र आहे, लहान मुलांसाठी माधव बाल संस्कार केंद्र आहे. येथे संगणक देखील शिकवले जाते. अभ्यासासाठी एक लहान ग्रंथालय देखील आहे. आणि हो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी. प्रत्येक आठ घरांच्या मध्यभागी एक नळाची तोटी आहे. एवढेच नव्ह्ये तर घरोघरी विज देखिल आहे.
हे सर्व शक्य झाले “केशव सृष्टी” या बहुआयामी प्रकल्पाच्या देखरेखीखाली चालणाऱ्या ग्रामविकास योजनेच्या प्रयत्नांमुळे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मरणार्थ “केशव सृष्टी” हा बहुआयामी प्रकल्प भाईंदरमध्ये चालवला जातो. डोंगरीपाडाच्या विकास प्रवासाचे शिल्पकार असलेले मुंबई महानगराचे माजी कार्यवाह, विमलजी केडिया आवर्जून सांगतात, की या विकास प्रवासाच्या वाटचालीच्या प्रत्येक पायरीवर, ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले. घरोघरी पाईप वाहून नेण्यापासून, ते पाण्याच्या टाकी अणि समाज मंदिराच्या बांधकामापर्यंत, ग्रामस्थांनी रात्रंदिवस श्रमदान, अणि देणगी देऊन काम पूर्ण केले. एवढेच नाही तर जशी जशी प्रगति गावात दिसायला लागली, तसेतसे ग्रामस्थांचे सहकार्य वाढले. समिती स्थापन करून प्रत्येकाने या कामांसाठी ठराविक रक्कम जमा करण्याचे ठरवले. पुण्याच्या खाजगी कंपनी ग्राम उर्जा ने दीड किलोमीटर खाली पाईप टाकून विहिरीपासून पाण्याच्या टाकीपर्यंत पाईप लाईन आणून, अणि त्याशिवाय ती घरोघरी नेऊन पोहोचविण्याचे कामही केले. या व्यतिरिक्त सौर पॅनेल टाकण्याचेही काम केले. मात्र या मोठ्या खर्चानंतर गावातील लोकांनी “केशव सृष्टी” कडून काहीही घेण्यास नकार दिला. सिंचना साठी नदीतून शेतात पाणी आणण्याचा, आणि पुढील सर्व देखभालीसाठी खर्च, गावकऱ्यांनी स्वतः उचलण्याचा निर्णय घेतला.
निसर्गाने डोंगरीपाडाला अदभुत सौंदर्याने बहाल केले होते. पण ही एक विडंबना होती, की खूप पाऊस झाल्यानंतरही पालघर जिल्ह्यातील या गावातील लोक थेंब थेंब पाण्यासाठी तळमळत होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न महिन्याला जेमतेम 2 हजार रुपये होते. नाइलाजाने गावातील पुरुषांना, सांसणे या डोंगराखाली असलेल्या गावात, इतरांच्या शेतात मजूर म्हणून काम करण्यास भाग पडत होते . अगदी लहान मुलांनाही 9 किलोमीटर दूर असलेल्या, वाडा या गावी प्राथमिक शाळेत शिकण्यासाठी जावे लागत होते. शाळेतून परतल्यावर गावात शिक्षणाची सोय नव्हती. पण आज विकासाचा प्रवाह डोंगरीपाड्यात वाहू लागला आहे. गावाच्या मध्यभागी असलेल्या कम्युनिटी हॉलमध्ये, ज्याला समाज मंदिर असे नाव देण्यात आले आहे, महिलांना 8 शिलाई मशीनवर शिवणकामाचे प्रशिक्षण दिले जाते. सध्या, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने मिळालेले दोन संगणक ,विद्यार्थ्यांना प्रारंभिक संगणक अभ्यासक्रम शिकण्यास मदत करत आहेत. ग्राम विकासासाठी विस्तारक म्हणून निघालेले "केशव सृष्टी" चे सचिन जी, ज्यांच्यावर 10 गावांच्या विकासाच दायित्व होत, ते सांगतात, हे समाज मंदिर गावकऱ्यांसाठी मंदिरा सारखेच आहे.
गणेशोत्सवापासून लग्नापर्यंत, ही वास्तु सर्वांना मोफत उपलब्ध आहे. दर आठवड्याला येथे होणाऱ्या सत्संगात, हळूहळू संपूर्ण गाव व्यसनमुक्त होत आहे. वारली जमातीचे वनवासी, जे नियमितपणे ताडी पितात, त्यांनी कमी जास्त प्रमाणात दारू सोडली आहे, आणि ते आता त्यांच्या शेतात तांदूळ आणि भाज्या पिकवून वर्षाला एक ते दीड लाख रुपये कमावतात. गावाच्या मध्यभागी उंचीवर बांधलेल्या टाकीमुळे वर्षभर पाण्याचा सुकाळ आहे . वर्षभरापूर्वीची एक घटना हा बदल समजून घेण्यासाठी पुरेशी आहे. प्रख्यात लेखक रतन शारदा जी जेव्हा डोंगरीपाडाच्या विकास प्रवासाला शब्द देण्यासाठी तेथे पोहोचले, तेव्हा त्यांच्या पत्नी श्यामाजींनी स्त्रियांना कुतूहलाने विचारले, आता तुम्हाला पुढे काय हवे आहे? या कथेचे सार ग्रामस्थांनी दिलेल्या या प्रश्नाच्या उत्तरांमध्ये दडलेले आहे. त्या वनवासींनी सांगितले की “आम्हाला हवे ते सर्व मिळाले आहे, आता आम्ही पुढचा मार्ग स्वत: घडवू”.
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।