सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

आणि त्यांचे जीवन बदलले-कानपूर उत्तरप्रदेश

उत्तर प्रदेश

parivartan-img

अत्यंत कडक उन्हातही लक्ष्मी यांना आज थोडे हायसे वाटत होते. डोक्यावरील घाम पुसतानाच त्यांनी उन्हात उभ्या राहिलेल्या मौनीला, त्यांच्या मुलीला त्यांनी जवळ घेतले. बक्षीस मिळालेला कप आपल्या दोन्ही हातामध्ये घेतलेली मौनी आज खूपच सुंदर दिसत होती. हेच हात तीनेक वर्षांपूर्वी गल्लीबोळातील रस्ते, मंदिरांतील लोकांसमोर पैसे मागण्यासाठी पुढे येत होते. आज त्याच हातात एक बक्षीस होते. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तिच्यातील हे परिवर्तन सेवाभारतीमुळे झाले. सेवाभारतीने त्यांच्या गावातील मुलांना शिकविण्याची जबाबदारी घेतली नसती, तर आजही मौनी कदाचित पैसे मागतानाच दिसली असती. केवळ मौनीच नव्हे, तर तिच्यासारख्या अनेक जणांना समाजाच्या मुख्य धारेमध्ये आणण्याचे काम सेवाभारतीने खूप कष्टपूर्वक केले. फ़क्त मौनीच नव्हे तर , मोहित, विशाल, मिठी, आशा अश्या अनेक मुलांची नावे सांगता येतील, ज्यांचे बालपण सेवाभारतीमुळे खुलले.




उत्तर प्रदेशातील कानपूरमधील कपाडिया परिसराला सर्व जण भिक्षेकऱ्यांचाच परिसर म्हणून ओळखत असत. वडील, मुलगाच नव्हे, तर साऱ्या कुटुंबाचाच व्यवसाय भिक्षेकरीचा होता. पण, कानपूरमध्ये तीन वर्षांपूर्वी सेवाभारती मातृमंडळ तर्फे बाल संस्कार, शिलाई आणि साक्षरता केंद्रे सुरू करण्यात आली. गावातील लोकांना यांतून शिक्षण आणि स्वावलंबनाचे धडे मिळाले. आज येथील विविध परिवारांतील 52 मुले गुरूकुल पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांच्या शिक्षणाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी विवेकानंद समितीने उचलली आहे. समितीचे संयोजक व संघाचे स्वयंसेवक विजय दीक्षित यांनी सांगितले, की या सर्व मुलांनी भीक मागणे आता कायमचे सोडून दिले आहे. कानपूरमध्ये पनकी हे नाव कानी पडले, तर आपल्या डोळ्यांसमोर हनुमान मंदिर उभे राहते. त्यामुळे या शहराला पनकी बाबांचे शहर म्हणूनही ओळखतात. पनकीधामपासून जवळच काही किलोमीटर अंतरावर गंगागंजमध्ये जवळजवळ शंभर कुटुंबांची एक वस्ती आहे. ती कपाडिया वस्ती म्हणून ओळखली जाते. इतर वस्तींपेक्षा ती वेगळी आहे. भिक्षेवर अवलंबून उदरनिर्वाह करणाऱ्या येथील लोकांमध्ये भांडणे होत असत. ते एकमेकांना शिव्या देत असत, जुगार खेळत, पानमसाला खाऊन गुजराण करीत असत. सेवाभारतीने बालसंस्कार केंद्राची सुरुवात केली नसती, तर यांच्या पुढील पिढ्यांनीही कदाचित यांच्याच पावलावर पाऊल ठेवले असते. या वस्तीतील मुलांना शिक्षणासाठी पाठवावे, यासाठी अक्षरशः आर्जवे करावी लागायची. मात्र, काही दिवसांतच त्याच परिवारातील महिलांच्या मागणीवरून शिलाई व साक्षरता केंद्रांचीही स्थापना करण्यात आली.




वस्तीमध्ये राहणाऱ्या वेदाने साक्षरता केंद्रासाठी आपल्या घरामध्ये जागा उपलब्ध करून दिली, तर सरला जी या भगिनी शिकविण्यासाठी एका पायावर तयार झाल्या. गेल्या तीन वर्षांत अनेक भगिनी शिक्षणाकडे वळल्या आहेत. आज त्या हिंदी शिकतात, सुंदर हस्ताक्षर काढतात, त्यांना जोडाक्षरे आणि पाढेही येतात. हे काम सुरुवातीला सोपे नक्कीच नव्हते. वस्तीतील लोक मातृमंडलच्या भगिनींकडे संशयाने पाहायचे. त्यांच्याशी बोलत नसत. पण, तृशमूल मिश्रा शैलजाजी, क्षमाजी यांच्यासारख्या भगिनींच्या अथक प्रयत्नांमुळे 22 ऑक्टोबर 2016 रोजी पहिल्या केंद्राची सुरुवात झाली. त्यानंतर जे काही झाले, ते अक्षरशः कल्पनातीत होते. मुलांवर उत्तम संस्कार होऊन त्यांनी पान-मसाला खाणे बंद केले आणि हळूहळू भिक्षेकरीतूनही बाहेर पड़ले. कायम मळके कपडे घालणारी मुले आता आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून केंद्रात येऊ लागली. मुलांना सुधारताना पाहून वस्तीतील महिलांनी सेवाभारतीच्या कार्यकर्त्यांना वस्तीतील महिलांना शिकविण्याची आणि रोजगारासाठी काही प्रशिक्षण देण्याची विनंती केली.



त्यानंतर शिलाई आणि प्रौढ शिक्षण केंद्राची स्थापना झाली. कपाडिया वस्तीतील लोकांचे जीवन बदलणे सुरू झाले. येथील काही जणांनी भीक मागणे सोडून देऊन मजुरी करणे सुरू केले. सोनी, शिवानी व साधना यांच्यासारख्या अनेक जणींनी शिलाईचे शिक्षण घेतले. त्या आता त्यांच्या घरी बुटीक व शिलाईची कामे करतात. सेवाभारती कानपुर नगरच्या मातृमंडळच्या अध्यक्षा क्षमा मिश्रा सांगतात, वस्तीतील मुले शिक्षणाबरोबरच जलद गतीने धावणे, लांब उडी, रिले रेस यांच्यासारख्या स्पर्धांमध्येदेखील भाग घेतात. त्यात त्यांनी अनेक पदकेही जिंकली आहेत. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात येथील मुलांनी संपूर्ण वंदे मातरम् गाऊन उपस्थितांना आश्चर्यचकित केले. दर आठवड्याला सुरू असणाऱ्या भजन मंडळांद्वारे या सर्व महिला एकमेकींच्या संपर्कात असतात. त्यांच्यात आता भांडणे होत नाहीत तर एकत्र काम करण्याच्या चर्चा करताना येथील लोक आता दिसत आहेत. 

संपर्क:- प्रीती जी 

संपर्क क्रमांक : 9450347173


739 Views
अगली कहानी