सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

आणि जीवन जिंकले

महाराष्ट्र

parivartan-img

फोन वरील आवाजही स्पष्ट नव्हता अणि कृष्णा महाडीक, बंगाली बाबूंना ओळखूही शकले नाहीत। त्यांना प्रश्न पडत होता की सिलिगुडी येथील विकास चक्रवर्ती, त्यांना आपल्या मुलाच्या लग्नासाठी फ्लाइट तिकीट कां पाठवित आहे? गोष्टही अखेर 20 वर्ष जुनी होती, जेंव्हा चक्रवर्ती आपल्या मुलाला, जो एका असाध्य रोगामुळे आजारी होता, घेउन टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे आले होते, अणि तेम्हां सम्पूर्ण कुटुंब, नाना पालकर स्मृती समितीच्या रुग्ण सेवा सदनात राहत होते।




त्यावेळी समितीचे मॅनेजर कृष्णा महाडीकच होते। ते संघाचे स्वयंसेवक होते। आलेल्या शेकड़ो कुटुंबा प्रमाणेच या मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबालाही जवळजवळ मोफत खाद्य प्रणाली द्वारे सर्व प्रकारची मदत मिळाली। या पाँच वर्षाच्या मुलाला विदुरनला तीव्र रक्त कर्क रोग होता, या रोगात दहालाखापैकी केवळ एखादाच व्यक्ति वाचू शकतो अणि यासाठी बोनमेरो प्रत्यारोपण आवश्यक आहे। या साठी 1997 मध्ये डॉक्टरांनी 13 लाख रूपयांचा खर्च सांगितला होता, ज्यांची व्यवस्था चक्रवर्ती कुटुम्ब स्वतःला विकून सुद्धा करू शकले नसते। मग मुंबईतील नाना पालकर स्मृति समितिने या कुटुंबाला मदतीचा पाठींबा दिला। आज आयटी इंजिनिअर झाल्यानंतर विदुरन आपल्या कृष्णा काका ला कसा  विसरला असता ? विकास चक्रवर्ती यांनी कृतज्ञ भावाने लग्नाची  पहिली  पत्रिका  देवा समोर ठेवण्याऐवजी, समिती समोर ठेवली । विदूरन सारखे किती तरी रुग्ण टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कर्करोगासारख्या असाध्य आजारा साठी येतात, तेव्हां त्यांच्यासाठी घर आणि कुटुंबाची भूमिका नाना पालकर रुग्ण सेवा सदनाने साकारली आहे।




येथे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीय लोकांसाठी 5 रुपयांत नाश्ता, 10 रुपयांत जेवण आणि निवास व्यवस्था 1 महिन्यासाठी अगदी मोफत आहे। 1968 मध्ये काही खोल्यांपासून सुरू झालेली ही समिती आज दहा मजली इमारतीत कार्यरत आहे। या इमारतीत रुग्ण सेवा सदन, डायलिसिस पेथॉलॉजी लॅब, 14 डायलिसिस मशीन, टी बी ट्रीटमेंट सेंटर, रुग्णवाहिका सेवा, वैधकीय केंद्र व योगा प्रशिक्षण केंद्र यशस्वी पणे चालत आहे। 



आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा विदुरन चक्रवर्ती जेंव्हा येथे आला होता, तेव्हां त्याचेवर उपचारासाठी बोनमेरो प्रत्यारोपण करण्याची गरज होती, त्यामधे डॉक्टरांची एकच अट होती की बोनमेरो प्रत्यारोपण फक्त भावंडा मध्येच करता येते। मग समिती ची इमारतच विदुरन च्या आई साठी माहेर बनले। ती तेथे 9 महिने राहिली आणि विदुरन वर उपचार सुरू राहिला। त्याच्या बहिणीचा जन्म सुद्धा येथेच झाला होता। त्यानंतर ची अडचण म्हणजे उपचारासाठी खर्चाची जुळवाजुळव ही होती, त्यासाठी समितीच्या काही देणगीदारांनी 2 लाख रुपयाची मदत केली, आणि 4 लाख रुपये भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी दिले। आज बेंगळुरू मधील ऐसेंचर कंपनीचे वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता विदुरन चक्रवर्ती यांच्या नावाने यू एस मेडिकल सायन्स मध्ये एक प्रकरण शिकवले जाते, ज्या मध्ये वैधकीय शास्त्राने एक चमत्कार केला होता। तो चमत्कार म्हणजे केवळ टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या डॉक्टरांचे परिश्रमच नव्हते, तर समितीच्या कार्यकर्त्यांची आपुलकी आणि आशीर्वाद हेही त्यामागे होते।




अशा कितीतरी कथा तुम्हाला समितीच्या रुग्ण सेवा सदनात ऐकू येतील। संघ प्रचारक दिवंगत नाना पालकर यांच्या स्मृतीस वाढलेले हे रुग्ण सेवा सदन गरीब रूग्ण व त्यांच्या कुटुंबीयांसाठी देवा चे घर आहे। 2004 ते 2017 पर्यंत येथे डायलिसिस सेंटर मघ्ये एकुण 110000 डायलिसिस झाले आहे। डायलिसिसची फी फ़क्त 350 रुपये आहे, तर इतर ठिकाणी त्यासाठी हजारो रुपये मोजावे लागलात। समिती विविध रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या ऑपरेशनसाठी मदत म्हणून दरमहा सुमारे 6 लाख 50 हजार रूपए खर्च करते। वाडिया रुग्णालयात बाळन्तिणीला मोफत जेवण ही वाटले जाते. मुंबईत कोणत्याही रुग्णाला उघड्यावर राहू देऊ नये हा समिती चा हेतू आहे।

959 Views
अगली कहानी