नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
माधुरी आफळे | भाग्यनगर | तेलंगणा
भारती तो क्षण आयुष्यात कधीच विसरू शकत
नाही, ज्या वेळी एका रस्ता अपघातात तिने आपले आई वडील गमावले होते. एवढेच नाही, तर
आपला डावा पाय, व उजवा हात गमावल्याने तिच्या आयुष्यात अर्थ राहिला नव्हता. सहा
वर्षाच्या निष्पाप भारतीसाठी नशिबाने सर्व दरवाजे बंद केले होते. सगळी कडे अंधार
असताना ईश्वराची एक छोटी पणती मात्र तिला रस्ता दाखवत होती. पुढे जेंव्हा भारती
काँम्प्युटर सायन्स शिकत होती तेंव्हा प्रत्येकाला आपल्या उदाहरणाने प्रेरणा द्यायची.
ती म्हणायची प्रत्येक व्यक्ती ला किती ही खडतर परिस्थिती असली, तरी आपले आयुष्य
सक्षम करण्यासाठी मिळालेले सकारात्मक मार्गदर्शन पराभवाला यशस्वीतेत बदलू शकते.
भारतीच्या जीवनाला नवीन दिशा, आत्मविश्वास आणि आधार देणारे तिचे कुटुंब म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर भाग्यनगरचा वैदेही आश्रम होता. तीन मुलींना घेऊन सुरू झालेला हा आश्रम आज अनाथ आणि परिस्थितीने गांजलेल्या 205 हून जास्त मुलींना फक्त आधारच देत नाही, तर त्यांना कौटुंबिक वातावरणातले सौख्य, उत्साह, आणि जीवनाचा आनंद लुटण्याची संधी देत आहे. संघाचे स्वयंसेवक अणि वैदेही समितीचे सचिव श्री बाळकृष्ण म्हणतात, "स्वर्गीय श्री पी व्ही देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व मुलींच्या समस्या केंद्रस्थानी ठेवून वैदेही सेवा समिती ची सुरुवात 1993 साली भाग्यनगर हैदराबाद येथे सेवा भारती च्या एका प्रकल्पातून झाली. 1999 मध्ये त्यावेळेचे संघाचे अखिल भारतीय सेवा प्रमुख श्री सूर्य नारायण राव यांच्या हस्ते वैदेही सेवा समितीच्या नवीन इमारतीची कोनशिला ठेवली गेली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक माननीय मोहन जी भागवत यांच्या हस्ते 2000 साली वैदेही सेवा समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले.
या आश्रमात राहून शिकून, लग्न करून सुखी आयुष्य जगणारी उमादेवी अभिमानाने सांगते," मी खूप भाग्यवान आहे की माझे बालपण वैदेही आश्रमात गेले. माझा पाच वर्षाचा मुलगा जेव्हा शाळेच्या वेशभूषा स्पर्धेत स्वातंत्र्यसैनिकाची वेशभूषा करून प्रथम क्रमांक मिळवतो, त्याचे सर्व श्रेय वैदेही आश्रमाला जाते, कारण मला लहानपणी नृत्य, संगीत, नाट्य कला, कराटे आणि इतर खेळांच्या स्पर्धेत भाग घेण्याची, आणि शिकण्याची संधी मिळाली, ज्याचा फायदा आज माझ्या तीन मुलांना मिळत आहे. तसेच आई-वडिलांच्या मृत्यूनंतर या आश्रमात आपल्या छोट्या बहिणींना योग कराटे नृत्य-गायन हस्तकला अश्या सर्व कलांचे शिक्षण देणाऱ्या रंगम्माला आपले पेपर क्विलिंग आणि मोत्यांच्या दागिन्यांचे कौतुक लंडनच्या कानाकोपऱ्यात होईल असे स्वप्नात ही वाटले नव्हते. सुरुवातीपासून आश्रमाची देखभाल करणाऱ्या आणि या मुलींना आपल्या प्रेमाने मार्गदर्शन करण्याऱ्या वैदेही आश्रमाच्या अध्यक्षा सीता कुमारी जी खूप आनंदाने सांगतात ,"प्रत्येक वर्षी वैदेही आश्रमात लग्न किंवा तत्सम कुठल्याही उत्सवाच्या वेळी, आमच्या मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांना आमंत्रण दिले जाते. मुलींबरोबर त्यांची मुलेही या कार्यक्रमाला येतात, त्यावेळी संयुक्त कुटुंबातील या नातवांच्या बागडण्याने हे प्रांगण गजबजून जाते.
करोना
साथीच्या भयावह काळातही या मुलींनी मदत केंद्र चालवून आपली सामाजिक जबाबदारी उत्तम
रीतीने पार पाडली
या आश्रमात ज्या मुलींचे आई-वडील किंवा
इतर नातेवाईक नाही आहेत, अशा सहा ते दहा वर्षाच्या मुलींना आश्रय
दिला जातो अणि दत्तक घेतले जाते. आश्रम व्यवस्थापन आईवडिलांची पूर्ण जबाबदारी
सांभाळत, उदरभरण , शिक्षण संस्कार , जीवन कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्व
विकासाची पूर्ण जबाबदारी घेऊन या मुलींना समाजासाठी एक आदर्श आणि प्रेरणा देणारे
व्यक्तिमत्व बनवण्याचा संकल्प समोर ठेवून काम करते. उत्कृष्ट शिक्षणासाठी
दहावीपर्यंत सर्व मुली सरस्वती शिशु विद्यामंदिर मध्ये शिकतात. या मुलींना खेळ, विज्ञान
शिबिरे, विविध कलागुण शिकणे, इत्यादींमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले
जाते. शिक्षण, संस्कार आणि राष्ट्रप्रेम निर्माण करण्याबरोबरच,
उच्च शिक्षणानंतर, विवाहाची पूर्ण जबाबदारी वैदेही आश्रम उचलते. आज आश्रमातल्या 21
मुली
पदव्युत्तर शिक्षणानंतर नोकरी करत आहेत. 2021 पर्यंत 45
मुलींच्या
लग्नात वैदेही आश्रमाने आई वडिलांचे कर्तव्य पार पाडलेले आहे, आणि म्हणूनच आश्रम
त्यांचे माहेर आहे.
जिथे समाजात एका बाजूला मुलगी म्हणून
जगण्यासाठी करावा लागणारा लढा, आणि आव्हाने बघितल्यावर त्याच समाजात, रणरणत्या
उन्हात वटवृक्षाच्या झाडाप्रमाणे सावली देत ताठ मानेने उभे असणारे, आणि या छोट्या
मुलींना सर्व कलागुणात पारंगत करून मोकळ्या आकाशात उडण्यासाठी पंखात
आत्मविश्वासाचे बळ देणारे, वैदेही आश्रमा सारखे हे संस्थान नक्कीच अभिमानास्पद
आहेत.
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।