नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
सौ प्रगती शीरपूरकर | केरळ
आपल्या डोक्यावर हक्काचे छप्पर असावे असे स्वप्न बाळणून अनेक गरीब कुटुंब आपले आयुष्य बेकायदेशीर झोपड्यांमध्ये तर काही रस्त्यावरील ऊन पाऊस थंडी सोसत कसे बसे काढत असतात, पण ह्यात जे नशीबवान असतात त्यांना आपला हक्काचा निवारा मिळतो तर काहींच्या वाटेला कष्ट सोसणे लिहिले असते।
केरळच्या इरिनजलकुडा नावांच्या छोट्याशा गावात शमशाद आपल्या पंगू आई वडिलांसोबत एका भाड्याच्या खोलीत कसा बसा राहत होता. त्यांनी स्वप्नात पण विचार नव्हता केला कि कधी त्याचा स्वतः चा हक्काचा निवारा होईल, पण आज त्याच्या जवळ व इतर २४ कुटुंबां जवळ हक्काची अशी आपली जागा आहे, व लवकरच हे सगळे त्यावर स्वप्नांचं घरटं उभं करणार आहे। हे सगळे त्या निर्धन कुटुंबां साठी कल्पेनेपलिकडले असले तरी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाने सातत्याने प्रयत्न करून त्याला साकार रूप दिले आहे। जेव्हा इरिनजलकुडा च्या सेवा भारतीचे स्वयंसेवक तेथील स्थायिक यशस्वी उद्धोगपती पिडिककट्टुपराम्बील सुंदरम ह्यांच्या कडे देणगी बाबत बोलण्यास गेले, तेव्हा तिथे जे काही घडले, ते बघून सगळे थक्कच राहिले. सुंदरमजींनी चक्क आपली २१७७७ वर्गफुटा ची जमीन संघाच्या मार्फत निर्धन कुटुंबाना घर बांधण्या करिता दान म्हणून दिली, ज्याची किंमत सुमारे ७५ लाख तरी असावी आणि इथूनच अश्या नवीन सेवेची वाटचाल सुरु झाली। सुंदरमजींच्या प्रेरणेने मुरियाड पंचायत मधील बनाजा इंदावन नावाच्या गडगंज श्रीमंत विधवेने पण आपली ४८ लाखाची १९६०० वर्गफुटा ची जमीन संघाच्या मार्फत गरजू लोकांना देण्याचे मनोगत जाहीर केल।
इरीनजलकुडा सेवा भारती चे सचिव पी हरिदास यांनी सांगितले कि ह्या भूमिदाना मुळे सेवा भारतीला सेवा कार्य करण्याचे अजून एक सोपान उघडले। सेवा भारतीच्या कार्यकर्त्याना गरीब बेघर कुटुंबाची यादी तयार करण्यात बरेच श्रम करावे लागले व त्यानंतर २४ कुटुंबांची नावे समोर आली आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाचे चीज झाले। इरिनजलकुडा गावात एक सोहळा ठरवून सुंदरम जी व बनावा इंदावन आणि मल्याळी चित्रपट तारा व राज्य सभा सदस्य सुरेश गोपी ह्या सगळ्यांच्या हजेरीत निवडलेल्या भाग्यवंत २४ कुटुंबांना प्रत्येकी 1348 वर्गफुट क्षेत्रफळाचा जमिनीचा तुकडा रेखांकित करून कायदेशीर सशर्त नोंदणी पत्राद्वारे देण्यात आले। अटीप्रमाणे धारक हि जागा पुढच्या १० वर्षा पर्यंत इतर कोणालाही विकू शकणार नाही केव्हां हस्तांतरित करू शकणार नाही। हा प्रवास इथेच ना थांबवता हे स्वयंसेवक दान दिलेल्या जमिनी वर घर बांधकाम करण्यास लागणारा खर्च गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे, अणि त्यासाठी हे गट सरकारी प्रकल्प व सामुदायिक /सयुंक्त क्षेत्रा सोबत इतर देणगीदारांशी सातत्याने भेटी करत आहे.
सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या व इतर गरजू लोकांच्या पोट भरण्याची सोय करण्या करिता २००७ मध्ये स्थापित झालेल्या “इरिनजलकुडा सेवा भारतीनी ” संस्थापक स्वयंसेवक श्री पी हरिदास, पी एम शंकरन आणि ए एस साथीसन ह्या सगळ्यांच्या कुशल नेतृत्वात गेल्या काही वर्षातच विलक्षण प्रगति केली आहे. इरिनजलकुडा सेवाभारती ने आपल्या कृतीतून जे काही करून दाखवले त्यानीं हजारो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले । सध्या इरिनजलकुडा सेवाभारती द्वारे संगमेश्वरा वानप्रस्था आश्रमम [वृध्द्ध वसती गृह] आणि सेवाश्रया निलयालम नावाचे मानसिक दुर्बलांसाठी डे केअर सेंटर , चोवीस तास रुग्ण वाहिनी सेवा, आणि फ्रिजर सेवा यशस्वी पणे संचालित करण्यात येत आहे।
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।