सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

बहुउद्देशीय वास्तु पंडित दीनदयाळ धाम मथुरा

भालचंद्र जोशी | फरह -मथुरा

Play podcast
parivartan-img

देवभूमि मथुरा येथील फरह या स्थानी एकेकाळी पिण्याचे पाणी भरण्यासाठी स्त्रिया, मुले आणि पुरुषांना खांद्या डोक्यावर, घागरी कळशा घेऊन दूर दूर हिंडावे लागत असेI त्या भागात सर्वत्र खारेपाणी असल्यामुळे पिण्याचे गोड पाणी इतके दुर्मिळ होते की कधीकधी त्यावरून आपापसात भांडण तंटा होत असेI गोड्या पाण्यावरून तिथल्या गावांमध्ये वरचेवर भांडणे होत असतI या भागात शेती हाच मुख्य व्यवसाय होता, आणि त्यासाठी पाणी ही अत्यावश्यक बाब होतीI शेतकरी कसेबसे आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करू शकत असत, परंतु उगवत्या पिढीसाठी काही भरीव तरतूद करण्याएवढी क्षमता त्यांच्या अंगी नव्हती, नाईलाजाने काही कुटुंबांना पोट भरण्यासाठी स्थलांतर करावे लागत असेI मुलाबाळांच्या शिक्षणाची ही धड व्यवस्था उपलब्ध नव्हतीI I

दीनदयाळ धाम औषध कारखान्यात काम करणाऱ्या महिला

जेव्हा एखादा योगी पुरुष अवतरतो, तेव्हा त्याच्या तपश्चर्येचे फळ त्या परिसरातील जनसामान्यांना कित्येक वर्षे मिळत राहतेI रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि एकात्म मानव दर्शनाचे प्रणेते, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवन चरित्रावरून हेच सिद्ध होतेI पंडितजींचा जन्म मथुरानगरीपासून 22 किलोमीटर दूर फरह या क्षेत्रात नगला चंद्रभान या गावी झालाI आज ते गाव दीनदयाळ धाम या नावानेच प्रसिद्ध आहेI 1982 साली  या ठिकाणी संघाचे वरिष्ठ अधिकारी कैलासवासी भाऊराव देवरस, कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी, इत्यादींनी दीनदयाळ उपाध्याय स्मारक समितीची स्थापना केली, आणि त्याद्वारे या भागात विकासाच्या अनेक शक्यता निर्माण केल्याI स्मारकाच्या रूपाने तेथे भव्य स्मृती भवन उभारण्यात आले, तेच आज दीनदयाळ धाम या नावाने विख्यात आहेI कुटुंबात ज्याप्रमाणे एका चुलीवर तयार झालेले भोजन कुटुंबातील अनेक जणांचे पोट भरते त्याप्रमाणे या स्मारक समितीद्वारे फरह भागातील 56 गावांचा सर्वांगीण विकास होत आहेI

दीनदयाळ धाम येथे उभारलेली शाळा

स्मारक समितीचे संचालक आणि संघाचे प्रचारक माननीय सोमपाल जी, हे याच गावातील संघाच्या शाखेत लहानपणी जात असतI ते सांगतात की या भागात गोड्या पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे, ते मिळवण्यासाठी लोकांना पैलोन मैल पायपीट करावी लागत असेI ही अडचण दूर करण्यासाठी 1992 साली तेथे गोड्या पाण्याची पाइप लाइन टाकण्याकरिता 12 स्टॅन्ड उभारण्यात आलेI आज तेथे गोड्या पाण्याची मोठी टाकी उभारण्यात आली असून, तेथून प्रत्येक घरी गोड्या पाण्याचा पुरवठा होत आहेI पाण्याचा प्रश्न सुटल्याबरोबर शेतीच्या विकासाच्याही अनेक वाटा उघडल्याI आज दिनदयाल धामामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाच हजार वृक्ष दिमाखात उभे आहेत, त्यात आवळ्याची एक सुंदर बागही आहेI विविध उपायांनी शेतकऱ्यांना आधुनिक आणि जैविक शेती करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे, दूषित पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध केले जाते, अणि त्याद्वारे रोज 75000 लिटर पाणी शेतीच्या सिंचनासाठी उपलब्ध झाले आहेI अनेकानेक विकास प्रकल्पांमुळे दीनदयाळधाम हे आज उत्तर प्रदेशातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहेI

दीनदयाळ धाम येथे सुमारे 5000 महिलांनी शिवणकामाचे प्रशिक्षण घेऊन रोजगार मिळवला

दीनदयाळ उपाध्याय सरस्वती विद्या मंदिराच्या वतीने दोन शाळा सुरू करण्यात आल्या आहेतI तेथे एक हजाराहून अधिक मुले मुली शिक्षण घेत आहेत, इतकेच नव्हे त्तर जवळच्या 25 गावांमध्ये विनामूल्य एकल विद्यालय चालवण्यात येत आहेत, तेथे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच उच्च स्तराचे संस्कारही प्राप्त होत आहेतI फरह विकास क्षेत्रातील आठ न्याय पंचायत क्षेत्रांमध्ये सहा सरस्वती शिक्षण संस्था चालवण्यात येतात, त्यात 33 गावांमधील सुमारे चौदाशे मुले शिक्षण घेत आहेतI अशाप्रकारे समितीने सर्व भागात प्रकल्प सुरू करून सर्वांगीण विकासाचा पाया घातलाI

उत्तर प्रदेशचे खाद्य एवं ग्रामोद्योग मंत्री श्री हेमेन्द्रजी, यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागातील लोकांना पूर्वी लहान मोठ्या आजारांवर उपचार करून घेण्यासाठी मैलोगणती प्रवास करून मथुरेला जावे लागत असे, ही समस्या लक्षात घेऊन दीनदयाळधाम मध्ये एक विनामूल्य आयुर्वेदिक उपचार केंद्र सुरू करण्यात आलेI तेथे दरवर्षी सुमारे 30 हजार रुग्णांवर उपचार केले जातातI याशिवाय तेथे निशुल्क नेत्र रोग शिबिरेशी, दंतरोग शिबिरे, अपंग सहाय्य शिबिरे, इत्यादींचे आयोजन केले जाते Iया परिसरात एक गोशाळा ही चालवण्यात येते, तेथे पंचगव्यांवर आधारित विविध प्रकाराची औषधे तयार करण्यात येतात, त्यामुळे तेथील महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळू लागला आहेI आत्तापर्यंत 40 महिलांनी औषध निर्माणचे प्रशिक्षण घेतले आहे, आणि त्या दरमहिन्याला साडेचार हजार रुपयांपर्यंत कमाई करत आहेतI

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मारक द्वार देवभूमी मथुरा

अनिताच्या पतीचे देहावसान झाले, पदरात दोन लहान मुले, पण ती आज शिवणकाम करून स्वाभिमानाने कुटुंबाचे पोट भरत आहेI रमाच्या सासूबाईंनी ही या केंद्रातून शिक्षण कामाचे शिवणकामाचे शिक्षण घेऊन स्वतः तर अर्थाजन केलेच पण आपल्या सुनबाई रमालाही त्यात पारंगत केलI शिवणकाम केंद्राद्वारे आत्तापर्यंत पाच हजार महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आहेI सध्या तेथे 35 महिला काम करत असून त्या दरमहिन्याला 5000 रुपये कमावत आहेतI या केंद्रात प्रशिक्षणासाठी आठ गावांमधून महिला येतात, या महिलांना त्यांच्या विवाहप्रसंगी शिवण यंत्राचा आहेर केला जातो

समितीचे एक पदाधिकारी श्री नितीन बहल यांनी सांगितले की दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मदिनी आणि स्मृतिदिनी प्रदर्शन मेळा इत्यादीचे आयोजन केले जाते, त्यात लाखो लोक सहभागी होतातI समितीने सामाजिक सभागृह, राधाकृष्ण मंदिर सत्संग भवन आणि ग्रंथालयाची उभारणी केली आहे, या सर्व उपक्रमांचा लाभ आसपासच्या गावांना होत आहेI निसर्गाशी समरस होत निसर्गाचा समतोल संभाळत मानवाचा विकास हाच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शनाचा गाभा आहे, याच विचारधारेच्या स्वरूपात पंडित दीनदयाळ जन्म स्मारक समिती, आज मथुरा या देवभूमीच्या अभिमान बिंदू म्हणून दिमाखात कार्यरत आहेI

संपर्क श्री रोहित जी

मोबाईल क्रमांक 9690878956

443 Views
अगली कहानी