सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

सूरतमध्ये खेड़ेगावांचे अभिशापमुक्त रूप!

गुजराथ

parivartan-img

सूरत (गुजरात) क्षेत्रातील वनवासी गावांमधे दारुची नशा वा त्यामुळे आलेली घोर गरीबी, यामुळे किती गोरगरीब महिलांचे जीवन असह्य्य झाले, किती जणींना मारझोड सहन करावी लागली , कितीनां उपासमारीला तोंड़ घावे लागले, आणि किती अभागी महिला अकाली विधवा झाल्या, याचा काही हिशोबच नाही।  वनवासी गावांमधील असंख्य हतभागी महिला दारूने लादलेल्या नरकयातना निमूटपणे सहन करित होत्या। पण सुरत येथील डॉ. आंबेड़कर वनवासी कल्याण विश्वस्त मंडळाने त्यांचे जीवन आमुलाग्र बदलुन टाकले।




डॉ. आंबेडकर वनवासी कल्याण विश्वस्त मंडळाची स्थापना 1999 साली रा. स्व. संघाचे प्रचारक श्री नरेन्द्र पंचसरा यांच्या पुढाकाराने झाली । या मंडळाने संस्कार वर्ग, युवक मंडळ, भजनी मंडळ, सखी मंडळे इत्यादि उपक्रम सूरू करून, त्याद्वारे वनवासी गावांमध्ये सर्वंकष विकासाचे प्रयत्न सुरू केले। हे विश्वस्त  मंडळ राष्ट्रीय सेवा भारती या संस्थेशी निगडित आहे। मंडळाने डांग अणि तापी जिल्हयांमध्ये 130 सखी मंडळांची स्थापना केली आणि त्याद्वारे 1600 महिलांमध्ये स्वावलंबन. आणि नेतृत्वगुणांचा विकास केला।  मंडळाने 250 गावांमधील शेतकऱ्यांना  जैविक शेती करायला, आणि स्वतःच  सुधारित बिवाणे विकसित करायला शिकवले।  




2006 साली तापी जिल्हयात सोमगर तालूक्यात ‘गताडी’ या गावी ग्राम विकासाचे काम हाती घेण्यात आले । त्यात आधुनिक तंत्राची शेती, जलसंवर्धन, दर्जेदार बियाणाचे उत्पादन, जीवामृत देशीखत इत्यादि उपक्रमांचा समावेष होता । शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासांठी शेतकऱ्यांचे मेळावे घेण्यात येतात। या सर्वांचा परिणाम म्हणजे गताडी हे गाव आता अवघ्या 14 वर्षात आदर्श ग्राम म्हणून विकसित झाले आहे । या गरीब, भोळ्या  वनवासी शेतकऱ्यांना कित्येक कंपन्यांनी आणि त्यांच्या दलालांनी कधी सुधारित बियाणाच्या नावाखाली तर कधी लघुउद्योगाच्या नावाखाली लुबाडले होते, त्यामुळे स्वाभाविकच हे वनवासी बंधु कोणावर ही  विश्वास ठेवायला तयार होत नव्हते, मात्र ‘सेवा धाम’ हा मंडळाचा फलक गावात लागला, कि असापासच्या गावातील शेकडो वनवासी शेतकरी तेथे विश्वासाने एकत्र येतात। अर्थात यामागे मंडळाच्या गेल्या 20 वर्षांच्या तपष्चर्येची आणि निरपेक्ष सेवेची पुण्यार्ह आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे। मंडळाला सर्वत्र सेवाधाम म्हणुन ओळखले जाते असे मंडळाचे अध्यक्ष तुलसी भाई मवानी यांनी सांगितले ।




येथे गेल्या 9 वर्षांपासून, गरीब पण बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी अत्यल्प शुल्क (केवळ 15 हजार रू) आकारून केंद्रिय लोकसेवा संघ, आणि गुजरात लोकसेवा संघाच्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे। ‘संभव’ या मार्गदर्शन केंद्राद्वारे शिकून यशस्वी झालेले 50 तरूण गुजरात सरकारमध्ये करसंकलन खात्यात विविध अधिकारी पदांवर काम करत आहेत। त्यात वापी येथील श्री सुनील गावित आणि इतरांचा समावेश आहे। सेवाधाम तर्फे 2003 साली आहवा या गावात एका भाडयाच्या वास्तुमध्ये विद्यार्थी वसतिगृह सुरू करण्यात आले । गरीब वस्तीतल्या 5वी ते 12वीं पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीही एक वसतिगृह 2005 साली आणि दुसरे वसतिगृह 2009 साली सुरू करण्यात आले।

दारूचा पारंपरिक शाप दूर करण्यासाठी सखी मंडळांनी पदर खोचून प्रयत्न सूरू केले । सुंदा या गावातील श्रीमती अनिता बेन यांनी सांगितले कि तेथील सखी मंडळाने गावातील दारूचा गुत्ता बंद पाडला । तसेच दारूच्या आहारी गेलेल्या पुरुष मण्डळींच्या व्यसनमुक्तिसाठी उपक्रम सुरु केले. डांग जिल्ह्यातील ‘जामळपाडा’ या गावातील 90 महिलांनी श्रीमती पुष्पाबेन पवार यांच्या नेतृत्वाखाली 25 हजार रू कर्ज काढुन तांदूळाचा व्यापार सुरू केला आणि अवघ्या वर्षभरात सर्व कर्ज फेडुन टाकले। डॉ. आंबेडकर वनवासी कल्याण विश्वस्त मंडळाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्या मदतीने या भागातप्रगतीचे एक नविन सोपान सुरु केले. आजही  भूपेंद्र भाई पटेल, ललित भाई बंसल, यांच्यासह रा.स्व. संघाचे अनेक स्वयंसेवक या भागात निःस्वार्थपणे काम करत आहेत। 

संपर्कः-  तुलसी भाई मवानी 


972443311

804 Views
अगली कहानी