सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

संकल्पसिद्धीसाठी संकल्प

केरळ

parivartan-img

केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील पुरथेनक्रुज गावात राहणाऱ्या शिखा सुरेंद्रनची स्वप्ने मोठी होती. मात्र, तिच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. वडील आजारपणामुळे अंथरुणावर, तर आई गृहिणी. शिखाने नातेवाइकांच्या मदतीने कसेबसे इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मात्र, तिला आयएएस व्हायचे होते. देशाची सेवा करायची होती. पण, दिल्लीमध्ये राहून स्पर्धा परीक्षांसाठीचे प्रशिक्षण घेणे पैशांअभावी तिला शक्य नव्हते. त्याच वेळी ती “संकल्प”मध्ये आली.




संघाचे प्रचारक संतोष तनेजा यांच्या प्रयत्नांनी 1986मध्ये संकल्प संस्था सुरू झाली. ही संस्था दिल्लीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देते. या ठिकाणी शिखाने प्रवेश घेतला. तिला त्यासाठी नाममात्र शुल्क द्यावे लागले. प्रशिक्षणाबरोबर तिची हॉस्टेलमध्ये राहण्याचीदेखील सोय झाली. तिच्या हुषारीला या ठिकाणी आकार मिळाला. तिने केलेले कष्ट फळाला आले आणि यूपीएससी परीक्षेत 2017-18 वर्षात शिखा सुरेंद्रन देशभरातून 16वी आली. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील रोनिजाजाट गावातील शेतकरी कुटुंबातील राजीव कुमार यांचीही कहाणी थोड्याफार फरकाने अशीच आहे. राजीव यांच्या कुटुंबातील कुणीही शिकलेले नाही. राजीव सध्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन मसुरी येथे आयएएसचे प्रशिक्षण घेत आहेत. आपल्या यशाचे श्रेय ते संकल्प संस्थेला देतात. संकल्प संस्था दर वर्षी 20 विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देते. ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना केवळ पैशांच्या अभावी पुढे जाता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना संकल्पमध्ये प्रशिक्षण दिले जाते. विशेषतः आदिवासी व ईशान्य भारतातील गरीब विद्यार्थ्यांसाठी संकल्प संस्था अगदी त्यांच्या परिवारातील असल्यासारखीच आहे. विद्यार्थ्यांसाठी पालक व गुरू अशा दोन्ही भूमिका ही संस्था बजावते.




संस्थेतील दिनचर्या अत्यंत शिस्तीची असते. पहाटे योगा, सायंकाळी शाखा आणि रात्री प्रार्थना या ठिकाणी होते. इतर संस्थांपेक्षा संकल्प संस्थेच्या याच बाबी विशेष आहेत. काश्मिरी नागरिकांसाठीच्या शिक्षणासाठी कार्य करणारे मेजर जनरल पी. के. सेहगल, श्री. श्री. रविशंकर यांच्यासारख्या व्यक्तींचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले जातात. त्यासाठी व्याख्यानांच्या विशेष मालिकांचे आयोजन केले जाते. अशा व्याख्यानांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्याबरोबरच जबाबदारीची एक जाणीव त्यांच्यात निर्माण होते. संस्थेचे संस्थापक संतोष म्हणतात, “देशाचा प्रथम विचार करणारे प्रशासकीय अधिकारी तयार करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून 1986मध्ये संस्थेची स्थापना केली. संकल्प संस्थेसाठी 2015 वर्ष फारच चांगले ठरले. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या 1256 विद्यार्थ्यांमध्ये संस्थेचे 670 यशस्वी विद्यार्थी होते.”

संकल्प संस्था दर वर्षी गुरू सन्मान सोहळा आयोजित करते. यामध्ये गुरूंबरोबर स्पर्धा परीक्षांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान केला जातो. एवढेच नव्हे, तर झिंझोली येथे दर वर्षी होणाऱ्या दिशा बोध शिबिरामध्ये देशभरातील दोनशे पदवीधारक विद्यार्थ्यांना नागरी सेवा परीक्षांच्या तयारीपूर्वी त्यासाठीच्या कराव्या लागणाऱ्या अभ्यासाबरोबरच देशासाठी आवश्यक असलेल्या जबाबदारीचे भानही ठेवण्याचा सल्ला दिला जातो. या शिबिरात सह सरकार्यवाह कृष्णगोपालजी यांच्यासह संघातील इतर वरिष्ठही मार्गदर्शन करतात. शिखा सुरेंद्रन सांगतात, “दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरात संकल्प संस्थेत इतके आपुलकीचे वातावरण असते, की आम्हाला आमच्या कुटुंबाची आठवणही येत नाही. संस्थेचे हे मोठे वैशिष्ट्य आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी भावना रुजावी, यासाठी दर वर्षी तीन दिवसांच्या व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. या व्याख्यानमालेत समाजातील विचारवंत देशातील विविध विचारांवर आपले विचार मांडतात.”

707 Views
अगली कहानी