नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।
5 mins read
महाराष्ट्र
शेती हा नेहमीच अडचणींचा, समस्याग्रस्त व्यवसाय राहीला आहे। अनेक शतकांपासून शेतकरी हा सतत अर्धपोटी राहिला आहे। लहान, अल्पभू धारक शेतकरी तर जास्तच पीडित आहे। जमिनीच्या छोट्या तुकड्यावर तो गुजराण करू शकत नाही, त्यात भर पडते ती अनियमित पावसाची आणि पिकांवरील रोगांची! महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील कोंघारा या गावातील सुनिता जाधव हिची कहाणी प्रातिनिधिक आहे। तिच्या पतीने शेतीतील समस्यांमुळे हतबल, निराश होऊन आत्महत्या केली त्यावेळी तिला नकतीच तिसरी मुलगी झाली होती। शेतीवर आपल्या कुटुंबाचे पोट भरता येत नाही, त्यामुळे कर्ज घ्याव लागत, अणि असे कर्ज शेतीच्या जोरावर फेड़ता येत नाही, म्हणून या कर्जापोटी दरवर्षी कित्येक शेतकरी आत्महत्या करतात। हे दुष्चक्र पाहून, शेतकऱ्यांना मदतीच्या हात देण्यासाठी शेतकरी विकास प्रकल्प सुरू करण्यात आला।
त्याचा प्रारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यवतमाळचे तत्कालीन विभाग प्रचारक आणि संघाचे अखिल भारतीय सहसंपर्कप्रमुख श्री सुनील जी देशपांडे यांनी 1997 साली केला। संस्थेने शेतीसाठी शुन्य खर्च योजना (झिरो बजेट स्कीम ) सुरू करून त्याखाली शेतकऱ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले , त्यामुळे मध्यम शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले । त्याचबरोबर संस्थेने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनाही रोजगारही पुरवला, आणि त्यांना आर्थिक दृष्टीने स्वावलंबी केले। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी निशुल्क वसतीग्रह सुरू करण्यात आले। साध्या या वस्तीगृहात 65 मुले राहत आहेत। पहिल्या तुकडीतील काही विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून बाहेर पडले आहेत।
संस्थेचे पूर्ण नाव दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसार मंडळ असे असून शेतकरी विकास प्रकल्प हा तिच्या कार्यकलापाचा एक पैलू आहे। संस्थेच्या प्रयत्नामुळे आतापर्यंत 400 शेतकरी कुटुंबे आत्मनिर्भर झाली आहेत, अशी माहिती संस्थेचे समन्वयक श्री गजानन परसोडकर यांनी दिली आहे। सुनिता जाधव यांची कहाणी बघाना, पतीने आत्महत्या केलेली, पदरात तीन लहान मुली! सुनीताला भविष्यात सर्व अंधारच दिसत होता। पण शेतकरी विकास प्रकल्पाचे कार्यकर्ते तिच्या मदतीला धावून गेले, आणि आज ती एक छोटे दुकान चालवून ताठ मानेने जगत आहे। संस्थेच्या सहाय्यामुळे तिच्या तिन्ही मुली नामवंत शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत।
शेतकऱ्यांच्या विकास करता संस्थेतर्फे विविध प्रयत्न करण्यात येत आहेत। त्यात विनामूल्य बियाणे पुरवणे, जैविक शेतीचे प्रशिक्षण, जलसंधारण, स्व-मदत गटांची स्थापना इत्यादींचा समावेश आहे। निस्वार्थपणे समाजसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना संस्थेतर्फे दरवर्षी 25 सप्टेंबरला दीनदयाळ उपाध्याय स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येतो।
लेखक
अंबरीश पाठक
सम्पर्क- श्री गजानन परसोडकर
मो। क्र। 8605542650
नियमित अपडेट के लिए सब्सक्राईब करें।