सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

यशोदा मातेचा पुनर्जन्म-विमला कुमावत

राजस्थान

parivartan-img

26 जनवरी 2003...हाच 62 वर्षे वयाच्या विमला कुमावत आपला जन्मदिवस असल्याचं सांगतात... जन्मदिवस नाही तर पुनर्जन्मदिवस...खरं सांगायचं तर अनेक जुन्या लोकांसारखंच त्यांनाही स्वतःची जन्मतारीख आठवत नाही. हो, त्यांना तो दिवस चांगलाच आठवतो, जेव्हा संघाचे वरिष्ठ प्रचारक धनप्रकाश त्यागी यांच्या प्रेरणेतून त्या जयपूरमधील आपल्या घराजवळच्या वाल्मिकी वस्तीतील कचरा वेचणाऱ्या 5 मुलांना पहिल्यांदा आपल्या घरी शिकविण्यासाठी घेऊन आल्या होत्या. तीन मुले, सुना आणि नाती-नातवांनी भरलेल्या कुटुंबाच्या मालकीण असलेल्या आठवी पास विमलाजींनी 48 वर्षांच्या वयात त्या मुलांचे जीवन सावरण्याचे ठरविले, जे दिवसभर कचरा वेचून पैसा कमावत होते. त्यातून काही पैशांची ते नशा करत असत, आणि उरलेल्यातून घरखर्च चालवण्यात मदत करत असत. मेहतरांच्या या वस्तीची स्थिती  अत्यंत वाईट होती, वस्तीच्या जवळपास भीषण घाण, छोट्याशा झोपडीत डुकरांच्या सान्निध्यात वाढणारी मुलं, त्यात व्यसनाच्या अधीन माता-पिता. अशात या मुलांच्या शिक्षणाची चिंता कोण करणार? मग विमलाजी ईश्वरी दूतासारख्या त्यांच्या जीवनात आल्या व त्यांचे नाक साफ करणे व नखे कापण्यापासून त्यांना संस्कारित व शिक्षित करण्याचे काम सुरू केले. या साधारण गृहिणीच्या अद्भुत संकल्प, निःस्वार्थ सेवाभाव आणि निरंतर कष्टांनी या मुलाच्या जीवनाची दशा व दिशा दोन्ही बदलली. सेवाभारतीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने आधी तीन वर्षे विमलाजींच्या घरात चालणारा वर्ग हळूहळू सेवाभारती बाल विद्यालयात परिवर्तित झाला. आज तिथे 400 हुन जास्त मुले शिकत आहेत.




चला आता भेटूया शिवानीला, जी आता बारावीत शिकत आहे. विमलाजींनी तिला तिच्या लहान बहिणीसह वसतिगृहात आणले होते, तो दिवस ही मुलगी अजूनही विसरलेली नाही. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर या दोन्ही बहिणी आपल्या काकू-काका व त्यांच्या 4 मुलांसमवेत छोट्या झोपडीत राहत होत्या. त्या इथे आल्या तेव्हा बहिणीच्या जखमांमध्ये अळ्यासुद्धा 

झाल्या होत्या, तरीही शिवानी सर्वांशी खूप भांडली होती, कारण तिला इकडे यायचे नव्हते. पण गेल्या वर्षी दहावीत 62%  गुण मिळविल्यानंतर ती आजीच्या (विमलाजीच्यां ) गळ्यात पडून स्फुंदून-स्फुंदून रडली होती, आणि त्यांच्यावर एक कविताही लिहिली होती. अशीच गाथा लोकेश कोळीबाबत सुद्धा आहे. बी. कॉम तृतीय वर्षाचा विद्यार्थी असलेला लोकेश हा आज त्याच बाल विद्यालयात शिक्षक आहे. लोकेश हा एक अतिशय गुणी बांसरीवादकसुद्धा आहे. विधवा आई आणि तीन भावा-बहिणींमध्ये सर्वात मोठा असलेल्या लोकेशला विमलाजी, तो केवळ आठ वर्षांचा असताना शिकवण्यासाठी बळजबरी घेऊन आल्या होत्या. बी .ए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी असलेल्या लक्ष्मीने आठवीची परीक्षा द्यावी यासाठी विमलाजींनी स्वत: वयाच्या 52 वर्षी आठवीची पुन्हा परीक्षा दिली होती. अशा किती तरी कथा इथे मिळतील.  

हे काम वाटते त्यापेक्षा खूप अधिक कठीण होते. एक तर या मुलांचे पालक त्यांना शिकण्यासाठी पाठविण्यास तयार नव्हते कारण कचऱ्यातून प्लास्टिक वेचून, निवडून जे पंधरा वीस रुपये मुले कमावून आणत, ते त्यांना मुलांच्या शिक्षणापेक्षा अधिक महत्त्वाचे वाटत असत . बऱ्यांच वेळा पटवून दिल्यावर ते या अटीवर सहमत झाले, की मुले चार तास अभ्यास करतील व बाकीच्या वेळात कचरा वेचतील.  तीन वर्षे मुले विमलाजींच्या घरातच शिक्षण घेत असत, पण जेव्हा मुलांची संख्या 100 वर झाली तेव्हा सेवाभारतीच्या सहकार्याने ही शाळा तंबूत भरू लागली. विमलाजी शिकवण्याबरोबरच मुलांना गीतेतील श्लोक, बाल रामायण, भजन इत्यादीसुद्धा शिकवत असत. ही मुले हार्मोनियम, ढोलक, झांजा वाजवणेही शिकली, आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शिवणकाम व भरतकामाचे वर्गही आयोजित करण्यात आले होते. जयपूरच्या हिंदू आध्यात्मिक मेळ्यात व्यासपीठावर या मुलांच्या सुमधुर कंठातून व तयारीच्या सुरांमधून बालरामायण बाहेर पडले, तेव्हा धनप्रकाशजींच्या डोळ्यात अश्रू तरळले. मेळ्यात मिळालेल्या अनेक ट्रॉफी मुले अभिमानाने दाखवतात.




आज, शारदा एन्क्लेव्हच्या दुमजली इमारतीत चालणाऱ्या या शाळेत शिक्षण घेणाऱ्या 325 मुलांचा संपूर्ण खर्च समाजाच्या सहकार्याने चालतो. 36 मुले इथेच वसतिगृहात राहतात. आपले कुटुंब सोडून विमलाजी आता या मुलांसमवेत इथेच राहतात, जेणेकरून मोठ्या मुलींचे शिक्षण बंद होऊ नये. मोठ्या मुलांना त्यांच्या आजी म्हणजे विमलाजी एसएससी, बँकिंग अशा परिक्षा द्यायला सोबत घेऊन जातात. शाळेची एक शाखा आता सांगानेरमध्ये बक्सावाल येथे तंबूत भरते. तिथे 125 मुले शिक्षण घेतात.

विमला जी यानीं एक साधारण गृहणी असून घर संभाळून समाज कार्य कसे करावे याचे एक उदाहरण त्यानीं घालून दिले आहे , किती गृहणी यावरून धड़ा घेउन, समाजकार्यासाठी पुढे येतात ते पहायचे!

965 Views
अगली कहानी