सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

आयुष्याचा ओघ बदलणारे नक्षीकाम-राजस्थान अनुपगढ

राजस्थान

parivartan-img

मेंदीने सुशोभित हात, कसोतील मांगामध्ये भरलेले कुंकूं आणि लालजर्द पादत्राणात नटलेल्या राखी, उषा आणि सीमा यांच्या आयुष्यात आजचा दिवस आनंदाची उधळण करीत आला होता ज्या रस्त्यांवर त्यांनी एके काळी भीक मागितली होती, त्याच रस्त्यांवर आज त्यांच्यावर असंख्य स्त्री पुरुष आशीर्वादांचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करीत होते. प्रसंग होता सेवाभारती या संस्थेने आयोजित केलेल्या सामूहिक विवाह-समारम्भाचा ! अनुपगढ येथील सेवा भारती या संस्थेने, भीक मागून जगणाऱ्या दुर्दैवी कुटुंबामधील मुलींना शिक्षणकाम, ब्युटी पार्लर, मेंदीकाम आणि इतर विविध प्रकारची कौशल्ये शिकवून स्वावलंबाना मार्ग दाखवला. पोटासाठी अन्नाची भिक्षा मागणाच्या  सीमाला अनेक घरांमधुन झिडकारले गेले पण आज ती त्यांच घरांमध्ये विवाह प्रसंगी नववधूचे हात मेंदीने सुशोभित करण्यासाठी सन्मानाने जात आहे .पूनम वर्षानुवर्षे घरोघरी डाळीची भिक्षा मागत असे त्यामुळे तिचे नावच डाळ असे पडले होते, आज तीच  पूनम स्वावलंबन केंद्रात शिक्षणकाम शिकून आपले स्वतः चे 'पूनम' बुटीक' सुरु करत आहे. अनुपगढ येथे सांसी , बिहारी, ढोली आणि बाजीगर यांची सुमारे 110 कुटुंबे आहेत. शिक्षण, रोजगार, आणि मानसन्मान यांना पारखी  झालेही ही कुटुम्बे, सतत दाळ, तांदूळ वगैरेची भीक मागणारी, धुळीत आणि धाणीत जीवन घालवणारी अशी होती. 




सेवा भारतीच्या जोधपूर प्रांताचे स्वावलंबन विभागप्रमुख श्री दिनकर पारिख आणि क्षेत्रीय प्रशिक्षण प्रमुख श्री गोविंदकुमार यांच्या ७-८ वर्षांच्या अविरत प्रयत्नांनी या अभागी कुटुंबाची जीवन सारणीच पूर्णपणे बदलून गेली आहे. विविध प्रकारची कौशल्ये प्राप्त करून हि कुटुंबे आता स्वाभिमानाने, ताठ मानेने जगत आहेत. आपण वाढवलेल्या फूल झाडांचा सुगन्ध किती दूरवर पसरला आहे याची माळ्याला कल्पना नसते . इयत्ता आठवी मध्ये शिकणारा अनाम पोरका राम संघ स्वयंसेवकांच्या मंदतीने सरकारी योजनांचे फायदे  घेत, कौशल्य प्रशिक्षण घेत, आपले भविष्य उज्ज्वल करू पाहात आहेत आहे, एकीकडे शिक्षण घेत असतानाच, त्याने मोटारींमधील सीट्स तयार करण्याचे कौशल्य हस्तगत केले असून, त्याच्या आधाराने तो आता दरमहा सात हजार रुपये कमवत आहे. त्याच्याच वस्तीतील सीमा फिजिओथेरेपीचे प्रशिक्षण घेत आहे, तर सुनीता एकीकडे बी.ए करत असतानाच, लहान मुलांच्या शिकवण्याही घेत आहे.



श्री गोविंदकुमार सांगतात कि एकेकाळी या वस्तीतले लोक अज्ञानाच्या अणि नशेच्या अंधारात पूर्णपणे  बुडून गेले होते, लहान मुलांच्या शिक्षणाचा पत्ताच नव्हता, पण संघ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे आता तेथील 250 पेक्षा जास्त मुलं मुली सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेवु लागली आहेत. किशोरी केंद्रामध्ये मुलींच्या कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात येतो, त्याची संपूर्ण जबाबदारी अनुपगढ महिला मंडळ तालुका अध्यक्ष श्रीमती जयविजय चौधरी या सांभाळत आहेत. स्वावलंबन केंद्राद्वारे वर्षभर विविध प्रकारचे 17 प्रशिक्षण प्रकल्प चालवण्यात येतात. तेथे महिला शिवणकाम शिकून पिशव्या, बंड्या, इत्याती वस्त्रे तयार करत आहे. श्रावण महिन्यात त्या राख्या, तर दिवाळीत पणत्या तयार करून आपल्या कुटुंबाना हातभार लावत आहेत.




या परिवर्तन यशोगाथेची सुरुवात आठ वर्षांपूर्वी झाली. संघाचे एक स्वयंसेवक, श्री दिनकर पारिख बसने अनुपगढ हुन दिल्लीला जात होते, त्यांनी बसच्या खिडकीतून दोन  लहान मुलांना कचऱ्यातून खाद्य पदार्थ वेचून खाताना पहिले, आणि ते तत्काळ खाली उतरले. त्याच क्षणी एका प्रदीर्घ सेवा योजनेचा प्रारंभ झाला. शुभारंभ संस्कार वर्ग, अणि भजनी मंडळाने झाला. दिनकर पारिख आणि रामरत्नजी (अनुपगढ तालुका अध्यक्ष) यांनी या वसतिचे विशेष शिवीर घेऊन तेथील परिवारांची सरकारी कागदपत्रांमध्ये नोंदणी केली. त्यामुळे त्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळू लागला. तेथील पुरुषांना केशकर्तनाचे प्रशिक्षण देण्यात आले, त्यामुळे ते तुरुंगातील कैदी, सीमा सुरक्षा दलाचे जवान, इत्यादींचे केस कापून तर काहीजण स्वतः चे केशकर्तनालय टाकून पैसे कमावू कागले. चार मुलींचा पिता असलेल्या अपंग पवननेही आपले छोटे केशकर्तनाचे दुकान टाकले आहे.




मुलांना शिक्षणासाठी शाळेत पाठवू, नशापाणी करणार नाही, आणि दरमहा किमान एक हजार यांची बचत करू , या अटी मान्य करणाऱ्या तरुणांना व्यवसायासाठी हातगाड्या वाटण्यात आल्या. यामध्ये चांभारकाम करणारे, ढोल वादन करणारे आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या  गोळा करणारे राकेश, काळुराम, ओमजी आणि पवन ढोली यांचा समावेश आहे. या उमक्रमामागे श्रीगंगानगर विभागाच्या महिला मंडळ सह विभाग संयोजिका श्रीमती भाग्यवतीजी पारीख यांची प्रेरणा आहे. अनेक गाडीलोहार कुटुंबाना ,किसान पत्रे देण्यात आली आहेत, त्यामुळे ही कुटुंबे आता शेतकरी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीची अवजारे तयार करून प्रतिष्ठेने जगत आहेत. मनात स्वाभिमानाची, आणि दृढनिश्चयाची ठिणगी पेरली कि जीवन मार्ग कसा उजळून निघतो, हे या कुटुंबांनी दाखवून दिले आहे. एकेकाळी पोटासाठी भीक मागणाऱ्या या कुटुंबांनी, अनुपगढ येथे 2019 च्या डिसेम्बर महीन्यात रा. स्व. संघाच्या प्राथमिक शिक्षण वर्गात 100 स्वयंसेवकांच्या भोजनाची व्यवस्था केली. सर्व भेदभाव दूर करत सामाजिक समरसतेचे अनोखे उदाहरण या उपक्रमाने दाखवून दिले आहे .

1021 Views
अगली कहानी