सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

अडवू नका उडूद्या पंखां मध्ये बळ येवूद्या

तेलंगणा

parivartan-img

इतरांचे तर सोडाच, तिला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता.. आयटी कॅम्पन्यांपैकी एक इन्फोसिसचे अपॉइंटमेंट लेटर रूपा च्या  हातात होते. आई विना जगण्याऱ्या रूपा साठी ते स्वप्ना सारखे होते. तेलंगाणा येथिल वारंगल जिल्यातील एका छोट्या खेड्यातिल ही मुलगी, आज आपल्या गावात कितीतरी मुलींसाठी आदर्श आहे. जवळच्या इलैदा गावाची वूल्लमा देखिल अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण केल्यावर एक उत्तम नोकरी करत आहे.

तेलंगाणाच्या वारंगल आणि  मेहबूब नगर जिल्ह्यातील खेड्यामध्ये, जेथे मुलींचे साधे शिकणेही गरजेचे मानले जात नव्हते, तिथल्या मुलींनी जी स्वप्ने कधी पाहिलिही नव्हती, ती स्वप्ने पूर्ण केली वंदेमातरम् संस्थेनी . त्या शिकल्या देखिल, वाढल्या देखिल, अणि त्यांच्या स्वप्नांना पंख दिले, ते संघा च्या स्वयंसेवक रवींद्र राव आणि त्यांच्या साथीदारांनी. मुलींना गावा बाहेर अभ्यासासाठी पाठविण्यात पालकांना तयार करणे हे संस्थेच्या कार्यकर्त्यांसाठी सर्वांत कठीण काम होत. वर्षानुवर्षे संस्थेशी संबंधित असलेले माधव रेड्डी सांगतात, की सुरुवातीच्या टप्प्यात पालक मुलींना उच्च शिक्षणासाठी गावाबाहेर पाठविण्यास तयार नव्हते. पण कसेतरी ते काही लोकांना समजावून घेण्यात यशस्वी झाले, अणि मग एक प्रघातच सुरू झाला.




कधी शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत मागासलेल्या या क्षेत्रात वंदेमातरम् संस्थेच्या प्रयत्नातून आज 388 तरूणांनी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. जेथे पूर्वी फक्त 12 टक्के मुलीच महाविद्यालयामध्ये पोहोचू शकत होत्या, तो आकडा आता पुरेसा वाढला आहे. आता पर्यंत संस्थेच्या माध्यमातून एकूण 1600 मुली पदवीधर झाल्या आहेत. संस्थेचे सचिव भास्कर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वयंसेवक ग्रामीण भागात जाऊन मुलींच्या पालकांकडून वचन घेतात, की शिक्षण पूर्ण होईपर्यंत ते आपल्या मुलीच लग्न करणार नाही. त्यानंतर संस्थे कडून या मुलींसाठी महाविद्यालयीन फी पासून त्यांच्या येण्याजाण्याच्या खर्चापर्यतची सर्व व्यवस्था केली जाते. दर तिमाहीत एक विशेष कार्यशाळा नीयोजित केली जाते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या करियरच्या पर्यायांची अचूक व ताजी माहिती दिली जाते. खेड्यातील विध्यार्थ्यांना शहरी मुलांबरोबर स्पर्धा करता यावी, याची तयारी करण्यासाठी संस्था वर्षांतून एकदा हायस्कूल विध्यार्थ्यांसाठी 45 दिवसीय शिविराचे नीयोजित   करते . सकाळी 4:30 पासून सुरू होणाऱ्या या शिविरात विविध विषयांचे तज्ज्ञ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करतात. तेलंगाणात कन्या शिक्षणाच्या क्षेत्रात वंदेमातरम् संस्थेचा हा उपक्रम वेगाने चळवळीचे रूप घेत आहे. संस्थेमार्फत सुशिक्षित मुली आपापल्या गावातल्या शारदा संकल्प केंद्रांच्या माध्यमातून स्त्री भ्रूणहत्या, बाल विवाह, महिलांचे आरोग्य आणि शिक्षण या विषयावर इतरांना जागरूक करत आहे।

994 Views
अगली कहानी